1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. आरती संग्रह
Written By वेबदुनिया|

छत्रपती शिवाजी महाराजांची आरती

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.

जयदेव जयदेव जय शिवराया ।
या या अनन्यशरणा आर्या ताराया॥ धृ ॥

आर्यांच्या देशावरि म्लेच्छांचा घाला ।
आला आला सावध हो शिवभूपाला ॥
सद्‌गदिता भूमाता दे तुज हाकेला ।
करूणारव भेदुनी तव ह्रदय न का गेला? ॥ १ ॥

श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी ।
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी ॥
ती पूता भूमाता म्लेच्छांही छळता ।
तुजवीण शिवराया तिज कोण दुजा त्राता? ॥ २ ॥

त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलो ।
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो ॥
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया ।
भगवन्‌ भगवद्‌गीता सार्थ कराया या ॥ ३ ॥

ऎकुनिया आर्यांचा धावा गहिवरला ।
करूणोक्ते स्वर्गी श्रीशिवनृपी गहिवरला ॥
देशास्तव शिवनेरी घेई देहाला ॥
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देशस्वातंत्र्याचा दाता तो झाला ।
बोला तत्‌श्रीमत्शिवनृप की जय बोला ॥ ४ ॥