Dharma Sangrah
✕

शिवजयंती शुभेच्छा Shiv Jayanti 2024 wishes in Marathi

Updated: सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (08:58 IST)
शिवजयंती च्या शुभेच्छा
 
चिरून छाती शत्रूची
रक्ताने आम्ही माखले या धरतीला
असेच नाही म्हणत मराठे,
शिवरायांच्या या जातीला..
जय शिवराय
 
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा
 
अंगात हवी रग
रक्तात हवी धग
छाती आपोआप फुगते
एकदा जय शिवराय बोलून बघ
जय शिवराय..
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा
 
अरे कापल्या जरी आमच्या नसा
तरी उधळण होईल भगव्या रक्ताची
आणि फाडली जरी आमची छाती
तरी दिसेल मूर्ती फक्त शिवरायांची…
जय शिवराय 
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले
धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
शिवरायांचे सैनिक आम्ही करू जीवाचे रान
मनात भगवा ध्यानात भगवा भगवा हिंदुस्थान
जय शिवराय
 
मराठी माझी जात
मराठी माझा धर्म
मराठी माझी माती
मराठी माझं रक्त
मराठी माझी शान
मराठी माझा मान
मराठी माझा राजा
जय शिवराय
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत
व स्फूर्ति स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी
राजे यांना मनाचा मुजरा
शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा
 
सिंहाची चाल…
गरुडाची नजर..
स्त्रियांचा आदर…
शत्रूचे मर्दन…
असेच असावे
 
इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व पहा

Jyeshtha Gauri Pujan Wishes in Marathi 2026 ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा

पाच शक्तिशाली स्तोत्रे: संकटकाळात पठण केल्यास बजरंगबली स्वतः रक्षण करतात

"रहस्य भाद्रपद महिन्याचे: महादेवाला वर्षातून फक्त एकाच महिन्यात का अर्पण केले जाते हे विशेष फूल?"

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य ''गुलकंद-ड्रायफ्रूट बेसन लाडू'' नक्की ट्राय करा

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments