गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By
Last Updated : शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (16:01 IST)

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार

* स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
 
* कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
 
* सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.
 
* एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही,
ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की,
ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. 
तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.
 
* कधीही आपले मस्तक वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.
 
* ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंगरही मातीचा गोळा वाटतो.
 
* असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात वीरता आहे, खरी वीरता विजयात आहे.
 
* जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो विश्वभरात विजयाचे पताके उभारु शकतो.
 
* सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग पालक,मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.
 
* राज्य छोट का असेना पण स्वतःच असावं, त्यामुळे स्वतःच अस्तिव निर्माण करा तर जग तुमचा आदर करेल
 
* शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.
 
* लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल पुढे जाऊन मोठे लक्ष्य ही गाठू शकते.
 
* कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा.
 
*  मरण आले तरी चालेल शरण जाणार नाही.