Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाग पंचमी : भारतात नाग पूजेशी निगडित जाणून घ्या 11 मनोरंजक माहिती

Updated: शनिवार, 18 जुलै 2020 (13:12 IST)
सुतळ नावाच्या पाताळात कश्यपांची पत्नी कद्रू पासून जन्मलेले अनेक डोकं असलेले नाग आणि कश्यपांच्या पत्नी क्रोधवशापासून जन्मलेल्या सापांचा समुदाय राहतो ज्यामध्ये कहूक, तक्षक, कालिया आणि सुषेण इत्यादी प्रमुख नाग आहेत. लक्षात ठेवा की साप आणि नाग हे दोन्ही वेगळे आहेत. सर्व नाग कद्रूचे मुलं होते तर सर्व साप हे क्रोधवशाचे मुलं असे. कश्यपांच्या क्रोधवशा नावाच्या राणीने साप, विंचू सारखे विषारी प्राणी जन्मले.
 
7 मनसा देवी नाग माता : देवी मनसा जी शिवाची मुलगी आहे, त्यांना देखील नाग माता म्हणतात, ज्यांचे लग्न जरत्कारू नावाच्या ऋषींसह झाले असे. एकदा राजा जनमेजयाने त्याचे वडील नागदंशाने मरण पावल्यावर, सर्व नागांना भस्मसात करण्यासाठी नाग यज्ञ केले. त्याचे परिणाम म्हणून सर्व नाग यज्ञ वेदीत पडून भस्मसात होऊ लागले. त्यानंतर मनसा देवींच्या मुलाने आस्तिकाने असे उपाय योजिले की ज्यामुळे नाग यज्ञ बंद झाले आणि सर्व नागांचे रक्षण झाले. तेव्हापासूनच मनसा देवी देखील नाग माता म्हणून ओळखली जाते.
 
8 नाग साम्राज्य : महाभारताच्या काळात पूर्ण भारतात नागा जातींचे समुदाय पसरले होते. विशेषतः कैलास पर्वताच्या जवळच्या भागात असम, मणीपूर, नागालँड पर्यंत यांचेच वर्चस्व असे. हे लोकं सर्प पूजक असल्यामुळे नागवंशी म्हणवले. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की शक किंवा नाग जाती हिमालयाच्या त्या भागास होती त्या भागास तिब्बत आहे आता पर्यंत तिब्बती देखील आपल्या भाषेला 'नागभाषा' असे म्हणतात.
 
9 काश्मिरातील अनंतनागाच्या नागांची राजधानी : एका सिद्धान्तानुसार हे मुळात काश्मीरचे होते. 'काश्मिरातील अनंतनागाचे परिसर यांचा गढ मानला आहे. कांगडा, कुल्लू आणि काश्मीरसह इतर डोंगरी भागात नाग ब्राह्मणाची एक जाती आजतायगत आहे. नाग वंशावळीत शेष नागाला नागांचा पहिला राजा मानतात. शेष नागालाच अनंत नावाने ओळखतात. अश्या प्रकारे अनंतानंतर वासुकी झाले मग तक्षक आणि पिंगळा. वासुकीचे कैलास जवळच राज्य होते आणि अशी आख्यायिका आहे की तक्षकानेच तक्षशीलेचा निर्माण करून आपल्या नावाने 'तक्षक' कूळ चालविले. या तिन्ही कथा पुराणात आढळते. त्यानंतरच कर्कोटक, ऐरावत, धृतराष्ट, अनंत, अही, मणिभद्र, अलापत्र, कंबल, अंशतर, धनंजय, कालिया, सौफू, दौद्धिया, काली, तखतू, धूमल, फाहल, काना इत्यादी नावाने नागांचे वंशज होते. भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी यांचे राज्य होते. नागा आदिवासीचे संबंध देखील नागांशी मानले आहेत. छत्तिसगढाच्या बस्तर येथे देखील नल आणि नाग वंश आणि कवर्धाच्या फणी-नाग वंशीयांचा उल्लेख आहे. पुराणात मध्यप्रदेशातील विदिशावर राज्य करणाऱ्या नाग वंशीय राजांमध्ये शेष, भोगीन, सदाचंद्र, धनधर्मा, भूतनंदी, शिशुनन्दी किंवा यशनंदी इत्यादींचा उल्लेख मिळतो.
 
पुराणानुसार एक काळ असाही होता जेव्हा नागा समाज संपूर्ण भारतात(पाक-बांगलादेश) शासक असे. त्या दरम्यान त्यांनी भारताच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी आपल्या विजयाचे झेंडे फडकवले होते. तक्षक, तनक आणि तुष्ट नागांच्या राजवंशाची पूर्वीपासूनची परंपरा आहे. या नाग वंशींमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी सर्व समाजाचे आणि प्रांतांचे लोकं होते.
 
10 शहर आणि गाव : नागवंशीयांनी भारताच्या बऱ्याच भागात राज्य केले. याच कारणास्तव भारतातील अनेक शहर आणि गाव 'नाग' शब्दांवर आधारित आहे. आख्यायिका आहे की महाराष्ट्राचे नागपूर शहर सर्वात आधी नागवंशीयांनी वसविले होते. तिथल्या नदीचे नाव नाग नदी देखील नागवंशीयांमुळे पाडले. नागपूरच्या जवळ प्राचीन शहर आहे त्याचे नाव नागरधन आहे महार जातीमुळे महाराष्ट्रापासून महाराष्ट्र झाला. महार जाती देखील नागवंशीयांचीच एक जात होती. या व्यतिरिक्त हिंदी भाष्यी राज्यात 'नागदाह' नावाचे बरेच शहर आणि गाव सापडतील. त्या जागेवरून देखील अनेक दंतकथा आहेत. नागा किंवा नागालँडला का बरं नागवंशीयांची भूमी मानले जाऊ शकत नाही.
 
11 नागकन्या : कुंतीच्या मुलगा अर्जुनाने पाताळाच्या एका नागकन्येशी लग्न केले होते. जिचे नाव उलुपी होते. ती विधवा असे. अर्जुनाशी लग्न करण्याचा पूर्वी एका बागेशी झाले होते ज्याला गरुडाने खाऊन टाकले होते. अर्जुन आणि उलूपीचा मुलगा अरावन होता ज्याचे दक्षिण भारतात देऊळ आहे आणि नपुंसक लोकं किंवा तृतीयपंथी लोकं त्यांना आपले पती मानतात. भीमाचा मुलगा घटोत्कचाचे लग्न देखील एका नागकन्येशी झाले होते. जिचे नाव आहिलवती होते आणि ज्याचा शूर योद्धा बर्बरिक होता.

सर्व पहा

मंगळवारी केवळ 5 मिनिट द्या, बजरंग बली सर्व कामे सुरळीत करतील

श्रावणात पचनास हलक्या, पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या ३ खास 'हेल्दी' उपवासाच्या रेसिपी

Mahadev Temple Darshan पृथ्वीनाथ मंदिर जे महाभारत काळातील असून ५,००० वर्षे जुने आहे

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments