1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : सोमवार, 27 जुलै 2020 (08:45 IST)

श्रावण सोमवार व्रत: 2 पौराणिक कथा, नक्की वाचा

Shravan Somwar In Marathi
श्रावण शब्द श्रवण पासून बनलेले आहे ज्याचा अर्थ आहे ऐकणे. म्हणजे याचा अर्थ ऐकून धर्माला समजून घेणं. वेदांना श्रुती म्हटले आहे म्हणजे त्या ज्ञानाला ईश्वराकडून ऐकून ऋषींनी लोकांना सांगितले. हा महिना भक्तिभाव आणि संतसंगासाठी असतो. श्रावणाचे सोमवार किंवा श्रावणाच्या महिनाच्या संदर्भात पुराणांमध्ये बरंच काही आढळतं. येथे आम्ही आपल्याला 2 कथा सांगत आहोत.
 
1 पहिली पौराणिक कथा: भगवान परशुरामांनी आपल्या आराध्य देव शिवाची याच महिन्यात नियमाने पूजा करून आपल्या कावड मध्ये गंगाजल भरून शिवाच्या देऊळात नेऊन शिवलिंगावर वाहिले होते. म्हणजेच कावडाची प्रथा चालविणारे भगवान परशुराम यांची पूजा देखील श्रावणाच्या महिन्यात केली जाते. भगवान परशुराम श्रावणाच्या महिन्याच्या दर सोमवारी कावडमध्ये पाणी भरून शिवाची पूजा करायचे. शिवांना श्रावणी सोमवार विशेष आवडतो. श्रावणात भगवान आशुतोषाचे गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक केल्याने थंडावा मिळतो. असे म्हणतात की भगवान परशुरामांमुळेच श्रावण महिन्यात शिवाची पूजा आणि उपवास सुरू झाले. 
 
2 दुसरी पौराणिक कथा: या संबंधात कथा अशी आहे की जेव्हा सनत कुमारांनी महादेवाला त्यांच्या श्रावण महिना आवडीचा असल्याचे कारण विचारले, तर महादेवांनी सांगितले की जेव्हा देवी सतीने आपल्या वडील दक्ष यांच्या घरात योगशक्तीने शरीराचे त्याग केले होते, त्यापूर्वीच देवी सतीने महादेवाला प्रत्येक जन्मात नवरा म्हणून मिळावे असे प्रण केले. आपल्या दुसऱ्या जन्मात देवी सतीने पार्वतीच्या नावाने राजा हिमाचल आणि राणी मैनाच्या घरात त्यांची मुलगी म्हणून जन्म घेतला. पार्वतीने तरुण वयात श्रावणाच्या महिन्यात कठीण उपास केले आणि त्यांना प्रसन्न करून त्यांच्याशी लग्न केले, त्यानंतर हा महिना महादेवांसाठी विशेष झाला.