Daily Horoscope

नाग पंचमी 2020 : जाणून घेऊ या शुभ मुहूर्त, मंत्र आणि कथा..

Updated: शनिवार, 25 जुलै 2020 (15:00 IST)
 
एके दिवशी मोठ्या सुनेने घराला सरविण्यासाठी पिवळी माती आणण्यासाठी इतर सर्व सुनांना आपल्या सोबतीस येण्यास सांगितले. इतर सर्व सुना तर तिच्यासह गेल्या आणि डाळकं आणि खुरपी घेऊन माती खणू लागल्या, त्याच क्षणी तेथे एक नाग निघतो. घाबरून मोठ्या सुनेने त्याला खुर्पीने मारण्यास सुरुवात केली असताना लहान सुनेने तिला असे करण्यास रोखले. या वर मोठ्या सुनेने नागाला सोडून दिले. तो नाग जवळच तेथेच बसून राहिला. लहान सून नागाला म्हणाली आम्ही आलोच, तू कोठेही जाऊ नकोस असे म्हणून तेथून निघून गेली. पण ती कामात व्यस्त झाली आणि नागाला म्हटलेली गोष्ट विसरली.
 
दुसऱ्या दिवशी तिला तिची गोष्ट आठवली. ती धावत धावत नागाच्या दिशेने गेली, तेथे नाग बसलेला होता. लहान सुनेने नागाला बघून ' नमस्कार नाग भाऊ ' असे म्हटले.
 
नाग म्हणाला की 'तू मला भाऊ म्हणून संबोधन केले आहेस म्हणून मी तुला क्षमा करतो', नाही तर खोटं बोलण्याच्या गुन्हा साठी मी तुला दंश केले असते. लहान सुनेने त्या साठी क्षमा मागितली तर नागाने तिला आपली बहीण बनविले.
 
काही दिवसानंतर तो साप एका माणसाचा रूप घेऊन लहान सुनेच्या घरी गेला आणि म्हणाला की 'माझ्या बहिणीची घरी पाठवणी करा.'  
 
सर्वजण म्हणाले की 'तिला तर भाऊ नाही' तर तो म्हणाला- 'की मी तिच्या लांबच्या नात्यातला भाऊ आहे, लहानपणीच बाहेर गेलो होतो'. त्याच्यावर विश्वास ठेवून घरातील माणसांनी तिला त्याचा सोबतीस पाठवले.
 
वाटेत नागाने लहान सुनेला सांगितले की मी तर तोच नाग आहोत आणि तिला घाबरण्याची काहीही गरज नाही. जेथे चालवले जाणार नाही तेथे माझी शेपटी धरून घे.
 
बहिणीने भावाचे ऐकले आणि तेथे पोहोचले जेथे सापाचे वारूळ होते. तेथील श्रीमंती आणि वैभव बघून ती आश्चर्यात पडली.
 
एके दिवशी चुकून लहान सुनेने नागाला थंड्यांच्या ऐवजी गरम दूध दिले ज्यामुळे त्याचे तोंड भाजले या वर त्या सापाची आई फार चिडली. तेव्हा सापाला वाटले की आता बहिणीला तिच्या घरी पाठवावे. या वर तिला भरपूर सोनं, चांदी आणि भेट वस्तू देऊन घरी पाठवले.
 
सापाने लहान सुनेस हिरे-मणक्यांचा एक अद्भुत हार दिला. तिची स्तुती सर्वत्र पसरली आणि राणीने देखील ऐकली. राणीने राजाकडून त्या हाराची मागणी केली. राजाच्या मंत्र्यांनी लहान सुनेकडून आणून तो हार राणीला दिला.
 
लहान सुनेने मनातल्या मनात आपल्या भावाची आठवण केली आणि म्हणाली 'भावा राणीने माझा हार हिसकवून घेतला आहे, आपण असे करा की ज्या वेळेस राणी गळ्यात हार घालेल ते साप बनून जावो आणि काढतातच पुन्हा हिरे- मणक्याचा होवो.' सापाने तसेच केले.
 
राणीकडून हार तर परत मिळाला पण, मोठ्या सुनेने तिच्या नवऱ्याची कान भरावाणी केली. नवऱ्याने आपल्या बायकोला बोलावून विचारले- 'हे पैसे तुला कोण देतं?' लहान सुनेने सापाची आठवण केली त्याच क्षणी तो प्रगट झाला. त्या नंतर लहान सुनेच्या नवऱ्याने नाग देवांचे आतिथ्य केले. त्याच दिवसापासून नागपंचमीला बायका नागाला भाऊ मानून त्याची पूजा करतात.
 
पूजा करण्याची पद्धत :
 
नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्मातून उरकल्यावर सर्वात आधी भगवान शंकराचे स्मरण करावं. त्यानंतर नाग-नागिणीच्या जोडप्याची प्रतिमे (सोनं,चांदी,तांब्याची बनलेली )च्या समोर हे मंत्र म्हणावं. -
 
अनंत वासुकी शेषं पद्मनाभ चं कम्बलम्।
शंखपाल धार्तराष्ट्रं तक्षक कालियं तथा।।
एतानि नवं नामानि नागानं चं महात्मनाम्।
सायंकाले पठेन्नित्यं प्रात:काले विशेषत:।।
तस्मै विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्।। 
 
या नंतर व्रत-कैवल्य आणि उपवास करण्याचा संकल्प घ्यावा. नाग-नागिणीच्या प्रतिमेस दुधाने अंघोळ घालावी. या नंतर शुद्ध पाण्याने अंघोळ घालून गंध, फुले, धूप,दिव्याने पूजा करून पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. पांढऱ्या कमळाचे फुल पूजेत ठेवावे आणि ही प्रार्थना करावी -
 
सर्वे नागा: प्रीयन्तां मे ये केचित् पृथिवीतले।
ये चं हेलिमरीचिस्था येन्तरे दिवि संस्थिता।।

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments