गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लंडन , गुरूवार, 12 जुलै 2018 (14:01 IST)

रॉजर फेडररला पराभवाचा धक्का

विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडचा टेनिसस्टार रॉजर फेडररला पराभवाचा धक्का बसला आहे. तब्बल 4 तास, 13 मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा टेनिसपटू केविन अँडरसनने गतविजेता फेडररचा 2-6, 6-7 (5/7), 7-5, 6-4, 13-11 अशा सेटमध्ये पराभव करत प्रथमच विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.