इंडोनेशिया मास्टर्स : सायना नेहवाल उपविजेती  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू हैदराबादची सायना नेहवाल हिला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
				  													
						
																							
									  
	 
	रविवारी खेळल्या गेलेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जगात अव्वलस्थानी असलेल्या ताई-झू-इंग हिने सायना नेहवालचा 21-9, 21-13 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. अंतिम लढत केवळ 27 मिनटे चालली व ती एकतर्फी होती. साडेतीन लाख अमेरिकन डॉलरच्या स्पर्धेत सायनाला इंगकडून सातववेळी पराभवाचा धक्का बसला. या दोघींमध्ये दहा सामने खेळले गेले. त्यापैकी नऊवेळा सायनाचा पराभव झाला आहे. 
				  				  
	 
	सायना ही कोपरा दुखपतीतून तंदुरूस्त झाल्यानंतर पहिलच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम सामन्यात एक वर्षानंतर खेळत होती. तिला सहजपणे पराभव पत्करावा लागला व तिला फारसा प्रतिकार करता आला नाही. यापूर्वी 2011 पर्यंत सायनाने तैवानच्या या खेळाडूविरुध्द यश मिळविता आले होते. परंतु, 2013 सायनाने तिचा स्वीस ओपन स्पर्धेत एकदाच पराभव केला आहे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	जगात बाराव्या स्थानावर असलेली सायना ही ताई-झू हिच्याशी बरोबरी करू शकत नाही. जबरदस्त फटके आणि फसवे परतीचे फटके याच जोरावर तिने हे यश मिळविले. सायनाने या सामन्यामध्ये अस्वाभाविक अशा बरच चुका केल्या. झू ने पहिल्या गेममध्ये 10-2 अशी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली. 
				  																								
											
									  
	 
	सायनाने काही गुण घेत सामन्यातून उसळून येण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती झू ला रोखू शकली नाही. दुसर्या गेममध्ये पहिल्या गेमची पुनरावृत्ती झाली. सायनाने उपान्त्पूर्व फेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधूला सरळ दोन गेममध्ये पराभव केले होते. त्यानंतर तिने उपान्त्य फेरीत थालँडच्या रॅटचानोक इंथानोन हिचा 48 मिनिटात दोन गेममध्ये पराभव केला होता.