सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जानेवारी 2018 (17:25 IST)

अनोखा विक्रम, कराटेमध्ये 54 सेकंदात 128 किक मारल्या

पुण्यातील सचिन सोलंकी यांनी कराटेमध्ये 54 सेकंदात 128 किक मारण्याचा अनोखा विक्रम केलाय.  मेडिसन बॉलवर उभं राहून आपला बॅलन्स साधणं हे एक जिकीरीचं काम... त्यातही त्यावर एका पायावर उभं राहून बॅलन्स करत तब्बल 128 कीक मारणं हे तर फारच कठीण... मात्र पुण्याच्या सचिन सोलंकी यांनी हे साध्य केलंय तेही केवळ 54 सेकंदात... सचिन यांच्या या कामगिरीची विश्वविक्रम म्हणून नोंद झालीय. या विक्रमासाठी त्यांनी 3 महिने कसून सराव केला.

हा विक्रम याआधी पाकिस्तानी कराटेपटू अहमद बोदलाच्या नावावर होता. बोदलाने सलग 44 किक मारून हा रेकॉर्ड केला होता. मात्र सचिन यांनी तो मोडताना तब्बल 128 किक मारल्या.