शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

रोनाल्डिन्होनेची फुटबॉलपटूमधून निवृत्तीची घोषणा

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिन्होने फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोनाल्डिन्हो मागच्या दोनवर्षांपासून व्यावसायिक फुटबॉलपासून दूर होता. रोनाल्डिन्हो ब्राझीलच्या 2002 सालच्या विश्वचषक विजेत्या फुटबॉल संघातील महत्वाचा खेळाडू होता.

 स्थानिक क्लबमधून करीयरला सुरुवात करणा-या रोनाल्डिन्होला पॅरिस सेंट जर्मेन क्लबकडून खेळताना ख-या अर्थाने नाव, प्रसिद्धी मिळाली. 2003 ते 2008 दरम्यान रोनाल्डिन्होने जगप्रसिद्ध बार्सिलोना क्लबचे प्रतिनिधीत्व केले.  2005 साली त्याची फीफाच्या सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी निवड झाली होती. 2008 ते 2011 दरम्यान  रोनाल्डिन्हो इटलीच्या एसी मिलान क्लबकडून खेळला.ब्राझीलला परतल्यानंतर रोनाल्डिन्होने फ्लामेंगो आणि अॅटलेटिको क्लबकडून खेळताना आपले कौशल्य दाखवले. ब्राझीलकडून 97 सामने खेळताना  रोनाल्डिन्होने 33 गोल केले. त्यातील दोन गोल 2002 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत केले होते.