बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 2 जानेवारी 2018 (12:59 IST)

रामनाथन दुसऱ्या फेरीत, कढे-पेरी चे आव्हान संपुष्ट

भारतीय रामकुमार रामनाथन यांनी त्यांच्या टाटा ओपनची चमकदार सुरुवात केली. स्पेनच्या 106 व्या स्थानावर असलेल्या रॉबेर्तो बॅना विरुद्ध खेळताना रामनाथन अस्वस्थ वाटले नाही.पुण्याचा लोकाने रामाला प्रोतसाहित केले ज्याचा रॉबेर्तो ला दडपण आले आणि पहिला सेट टायब्रेकरमध्ये गेला. रामाने पहिल्या सेटमध्ये 5 ऐस मारले आणि पहिला सेट ७-६ ने जिंकला. पहिल्या सेटवर विजय मिळविल्यानंतर त्याला थांबवणं सोपं नव्हतं, दुसऱ्या सेट मध्ये रामाने रॉबेर्तो ची दोनदा सर्व्हिस ब्रेक केली. 8व्या ऐस मारत रामाने शानदार स्वरूपात दुसऱ्या फेरीत आपले स्थान सुनिश्चित केले. रामला आता जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थाना वर असलेल्या मारिन चिलीच बरोबर  बुधवारी गाठ असणार आहे. अन्य एका सामान्य मध्ये, स्पेनच्या क्वालिफायर रिकार्डो ओजेदाने सरळ सेट्समध्ये 6 व्या मानांकित चेक रिपब्लिकच्या जिरी वेस्लेचा पराभव करून टाटा ओपनचा प्रथम उलातफेर केला. ओजेदाने प्रथम सेटमध्ये 6-3 असा 38 मिनिटांपेक्षा कमी वेळात जिंकला. व्हेस्लेने दुसऱ्या सेटमध्ये पुनर्गमन करण्याचा प्रयत्न केला परंतु ओझादा टायब्रेकर आणि सामना 6-3, 7-6 असा जिंकला. फ्रेंच खेळाडूंना गेलस सायमन, पिएर हर्बर्ट यांनी सुद्धा दुसऱ्या फेरीत आपले स्थान सुनिश्चित केले.

पुरुष दुहेरीत आज एकही भारतीय दुसऱ्या फेरीत स्थान मिळवू शकला नाही. पुण्याचा अर्जुन कढे आणि बेनॉइट पेरी याना नेदरलँडच्या रॉबिन हास आणि मट्ट मिडेलकूपच्या द्वितीय मानांकित जोडीशी झुंजार खेळी करावी केली. कढे-पेरे यांनी पहिल्या सर्व्हिसवर 79% गुण जिंकले आणि पहिला सेट 6-1 ने जिंकला. दुसरा सेट खूप रोमांचक स्थित आला, कढे-पेरे सामना जिंकण्याचा मार्गावर असतानाच, हसे आणि मिडेलकूप यांनी पेरेची सर्व्हिस मोडीत काढली आणि 7-5 ने दुसरा सेट जिंकले. सामना टायब्रेकरमध्ये हसे आणि मिडलकोपने 3-0 अशी आघाडी घेतली पण कढेचा एक रिटर्न ऐस ने स्टेडियमच्या वातावरण बदलून गेला. पुनरागमन ची आशा निर्माण झाली आणि कढे-पेरेने 6-5 ने पाठलाग करत होते. पेरे यांनी दोन प्रकारच्या चुका केल्या आणि टेनिस रॅकेटवर निराशा काढून घेतली. त्यांनी रॅकेट बदलला परंतु सामनाचा निकाल बदलू शकला नाही. डच जोडीने सामना टाय ब्रेकर 10-7 असा जिंकला. बालेवाडी स्टेडियमचा सेन्टर कोर्ट वर हजारोंच्या चाहत्यांनी कढे व पेअरचा सहभाग ला प्रशंसा केली. अन्य दुहेरीच्या सामन्यात भारतीय जोडी आणि वाइल्ड कार्ड प्रवेश विष्णु वर्धन आणि एन. बालाजी पहिल्या फेरीत आदिल शम्सउद्दीन (कॅनडा) आणि नल स्कूपस्की (इंग्लंड) यांच्या कडून 6-3, 6-7, 6-10 असे फारकाने पराभूत झाले.

- अभिजीत देशमुख