1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

सोमदेवचे टेनिसला अलविदा

भारताचा टेनिसपटू सोमदेव देववर्मनचे व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दुखापतींना कंटाळून सोमदेवने हा निर्णय घेतला आहे. सोमदेवने ट्विटरवरून निवृत्ती बद्दलची माहिती दिली आहे.
 
2017 या वर्षाची सुरुवात व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेत करतो आहे. इतक्या वर्षापासून पाठिंबा देणार्‍या आणि प्रेम करणार्‍या सर्वांचे आभार, अशा शब्दांमध्ये सोमदेव त्यांच्या निवृत्त्तीची माहिती ट्विटरवर दिली आहे. खांद्याला वारंवार होणार्‍या दुखापतीमुळे सोमदेव परेशान झाला होता. गेल्या काळी काळापासून सोमदेव टेनिसपासून दूर राहिला होता.
 
आता त्याची प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता आहे. सोमदेवने 2008 मध्ये टेनिसमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा सोमदेव भारताचा एकेरीतील स्टार खेळाडू होता. डेविसकप स्पर्धेत सोमदेव भारताकडून 14 सामन्यांमध्ये खेळला आहे. 2010 मध्ये भारताला जागतिक गटात स्थान मिळवून देण्यात सोमदेव महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.