शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Updated : मंगळवार, 18 जुलै 2023 (13:40 IST)

तुमचं आधार कार्ड 10 वर्षांहून अधिक जुनं असेल तर...

aadhar card
आधार कार्ड आणि त्यासंबंधी होणारी फसवणूक टाळण्यासाठी भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागानं नागरिकांना आधार अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे. तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल आणि याआधी कधी ते अपडेट केलं नसेल, तर ते ताबडतोब अपडेट करुन घेण्याचा सल्ला आधार म्हणजेच यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथॅरिटी ऑफ इंडियानंही दिला आहे.

याविषयी स्पष्ट सूचना 'आधार'च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. आधार अपडेट केल्यास ते वापण्यास सुलभता येईल आणि त्यामुळे अचूकता वाढेल, असं या सूचनेत म्हटलं आहे.
 
तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या भागातील आधार केंद्रावर जाऊन अपडेट करू शकता किंवा ऑनलाईनही ते अपडेट करता येईल.
 
आधार कार्डवरील कोणती माहिती ऑनलाईन पद्धतीनं अपडेट किंवा दुरुस्त करता येते याचीच माहिती आता जाणून घेऊया.
आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्यासाठी वेबसाईटवर जायचं आहे. इथं Log in पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, पुढे Captcha टाकून सेंड ओटीपी पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल. तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. मग Log in वर क्लिक करायचं आहे. पुढे ‘My Aadhar’ नावाचं एक नवीन पेज ओपन होईल.
 
इथं वेगवेगळ्या सेवांची यादी तुम्हाला दिसेल. त्यातील ‘Online Update Services’ या रकान्यावर क्लिक करायचं आहे.
 
एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथल्या ‘Update Aadhar Online’ या रकान्यात क्लिक करायचं आहे.
 
आता पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल. इथं आधार अपडेट कसं होतं, त्याची सविस्तर प्रक्रिया 9 मुद्द्यांमध्ये सांगितलेली असेल.
या पोर्टलवरून तुम्ही तुमचं नाव, जन्मतारिख, लिंग आणि पत्ता अपडेट करू शकता, अशी सूचना पहिल्याच मुद्द्यात दिलेली असेल.
 
पण, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आणि बायोमेट्रिक डेटा अपडेट करायचा असेल तर मात्र जवळच्या आधार सेवा केंद्रावर जावं लागेल.
 
आधार अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क लागेल, त्यानंतर तुम्हाला एक Service Request Number दिला जाईल, ज्याचा वापर करून तुम्ही अपडेटचं स्टेटस पाहू शकाल.
 
30 दिवसांत ही प्रक्रिया पार पडेल आणि एसएमएसद्वारे तुम्हाला तसं कळवलं जाईल, अशा सूचना इथं असतील.
 
पुढे तुम्हाला ‘Proceed to Update Aadhar’ या पर्यायावर क्लिक कराचयं आहे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला नाव, जन्मतारिख, लिंग आणि पत्ता यापैकी जे काही अपडेट करायचं आहे, तो एक पर्याय निवडायचा आहे.
 
समजा मला पत्ता अपडेट करायची असल्यानं मी address या रकान्यावर क्लिक केलं आहे. त्यानंतर ‘Proceed to Update Aadhar’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
तिथे Current Details रकान्यात तुम्हाला तुमचा आधीचा पत्ता दिसेल, Details to be Updated या रकान्यात जी माहिती अपडेट करायची आहे तुम्हाला ती भरायची आहे. सुरुवातीला इंग्रजी आणि मग मराठीत नाव टाकायचं आहे.
 
Area या रकान्यात गावाचं, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे.
 
हीच माहिती खालच्या रकान्यात मराठीत टाकायची आहे.
 
पुढे Pin Code टाकला की राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येतं. पुढे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव (Village) आणि पोस्ट ऑफिसचं (Post Office) नाव निवडायचं आहे.
Select Valid Supporting Document Type या रकान्यामध्ये दिलेल्या कागदपत्रांपैकी एक कागपदत्र निवडायचं आहे.
 
त्यानंतर View details and upload documents वर क्लिक करायचं आहे.
 
त्यानंतर स्क्रीनवर एक सूचना येईल, ती वाचून continue to upload वर क्लिक करायचं आहे. हे डाक्यूमेंट अपलोड झालं की next वर क्लिक करायचं आहे.
 
इथं तुम्हाला तुम्ही अपडेट केलेला डेटा दिसून येईल. तो वाचून खाली असलेल्या दोन्ही पर्यायावर तुम्हाला टिक करून next वर क्लिक करायचं आहे.
 
पुढे तुम्हाला 50 रुपये एवढं पेमेंट करायचं आहे. इथल्या सूचनेवर टिक करायचं आहे आणि मग make payment वर क्लिक करायचं आहे.
 
डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, यूपीआय, नेटबँकिंग, पेटीएम, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही हे पेमेंट करू शकता.
पेमेंट केलं की ते सक्सेस झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल. येथील download acknowledgement वर क्लिक केलं की तुम्हाला पेमेंट केल्याची पावती पीडीएफमध्ये डाऊनलोड होऊन मिळेल.
 
या पावतीवर तुमची आधीची माहिती आणि अपडेट करून काय हवंय, तेही नमूद केलेलं असेल.
 
आधारच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 30 दिवसांत तुमचं आधार कार्ड अपडेट होईल. त्यानंतर आधार लेटर तुमच्या पत्त्यावर पाठवून दिलं जाईल.
 
Published By- Priya Dixit