Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र 2022 : महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतनासाठी नोंदणी आणि पात्रता जाणून घ्या

Updated: बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (12:28 IST)
* या योजनेच्या मदतीने, एक विधवा महिला सहजपणे तिच्या मुलांचे संगोपन करू शकतात.
* राज्यातील सर्व विधवा स्त्रिया कोणत्याही आर्थिक समस्येशिवाय त्यांचे जीवन सहज जगू शकतात.
* जीवनातील आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना इतर कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
* सरकारने दिलेली पेन्शनची आर्थिक रक्कम लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात थेट पाठवण्यात येईल.
* या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला दरमहा 600 रुपये दिले जातील.
* महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना 2022 द्वारे, एखाद्या विधवा महिलेला एकापेक्षा जास्त अपत्ये असल्यास, त्यांना योजनेअंतर्गत दरमहा 900 रुपये आर्थिक रक्कम दिली जाईल.
* या पेन्शन योजनेद्वारे विधवा महिला आपले कुटुंब सांभाळू शकतात आणि त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात.
 
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेची उद्दिष्टे- 
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की राज्यातील विधवा महिलांना आपले कुटुंब चालवण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही आणि त्या आपल्या कुटुंबाचा व्यवस्थित सांभाळ करू शकतील.
 
* पेन्शन योजनेतून मिळालेल्या आर्थिक रकमेतून ती  स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल, 
पतीच्या निधनानंतर महिलेला कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही आणि तिची आर्थिक परिस्थिती देखील कमकुवत होते. ती आपल्या दैनंदिन जीवनात आर्थिक गरजा भागवू शकत नाही. हे पाहता राज्य सरकार महाराष्ट्र 2021 या विधवा निवृत्ती वेतनाची योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ज्या विधवा महिलांना आधार नाही त्यांना आर्थिक आधार देऊन स्वावलंबी बनवण्यात येईल.
 
आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्र विधा पेन्शन योजनेचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. या कागदपत्रांच्या आधारे, तुम्ही फॉर्म भरून विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकतात.
 
* अर्जदार महिलेचे आधार कार्ड
* मतदार ओळखपत्र
* कायम रहिवासी प्रमाणपत्र
* वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
* जन्म प्रमाणपत्र
* पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
* जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती जमातीची असल्यास )
*बँक खाते पासबुक
* मोबाईल नंबर
* पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
 
महाराष्ट्र विधवा निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्रता -
अर्जदार महिलांना महाराष्ट्र विधा पेन्शन योजना लागू करण्यापूर्वी काही पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. या पात्रता पूर्ण केल्यानंतरच तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकता. या पात्रता खालीलप्रमाणे आहेत -
 
* अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.
* योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असावे.
* अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 21,000 पेक्ष्या जास्त नसावे.
* अर्जदाराचे बँक खाते असले पाहिजे आणि बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असणे गर्जेचे आहे.
* दारिद्र्यरेषेखालील सर्व विधवा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
 
 
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना 2022 मध्ये अर्ज कसा करावा?
महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा. दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून तुम्ही महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना 2022 अर्ज सहजपणे भरण्यास सक्षम व्हाल. 
 
अर्ज कसा व कुठे करावा?
* सर्वप्रथम, लाभार्थी महिलेला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
* अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर होम पेज उघडेल.
* होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला फॉर्मचा पर्याय दिसेल. 
 * महाराष्ट्र-विधवा-पेन्शन-योजना
* आता तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.क्लिक केल्यानंतर, तुम्हाला फॉर्मची यादी दिसेल.
* यादीत तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा पर्याय निवडावा लागेल. महाराष्ट्र-विधवा-पेन्शन-योजना-फॉर्म निवड केल्यानंतर, फॉर्म तुमच्या स्क्रीनवर उघडेल. फॉर्म उघडल्यानंतर, आता तुम्ही येथून सहजपणे अर्जाची PDF डाउनलोड करू शकता.
* फॉर्म डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की अर्जदाराचे नाव, पत्त्याशी संबंधित माहिती, जन्मतारीख इ. प्रविष्ट करावी लागेल.
सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला फॉर्मसोबत मागवलेल्या कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत जोडावी लागेल.
* आता तुम्हाला तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तुमचा पेन्शन योजनेचा अर्ज सादर करावा लागेल.
* अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला विधवा पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकेल.
अधिकृत वेबसाइट – mumbaisuburban.gov.in/scheme/sanjay-gandhi-niradhar-pension-scheme/
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

स्वातंत्र्यदिनी उठून दिसण्यासाठी अशा प्रकारे करा मेकअप

सर्पदंशामुळे ३ आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू प्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

LIVE: गडचिरोली जिल्ह्यातील शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

एसटी बस स्थानकांच्या इमारतींना वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप देण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

ठाणे आणि पालघरमध्ये देशद्रोही सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या ५ तरुणांना अटक

पुढील लेख
Show comments