Dharma Sangrah
✕

ऊसाचा 'गाळप हंगाम' म्हणजे काय जाणून घ्या ?

Updated: शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (09:12 IST)
 
सुरवातीला मशीन मधे उसाचे तुकडे करून चरकातून ऊस पिळून त्याचा रस व पाचट वेगळे केले जाते. याला केन क्रशिंग (cane crushing) किंवा ऊस गाळणे असे म्हणतात. साखर कारखान्याची क्षमता तो कारखाना दिवसाला किती टन ऊस गाळप (crush ) करूं शकतो त्यावर मोजली जाते.
 
भारतात हा हंगाम बाराही महिने चालत नाही म्हणजेच ठराविक हंगामापुरता ऊस पुरवठा उपलब्ध असतो म्हणून ज्या ठराविक काळातच साखर कारखाना चालू असतो त्याला त्या कारखान्याचा गळीत हंगाम असे म्हणतात.
 
हा हंगाम साधारण 120 ते 150 दिवस चालतो. जर त्या वर्षी म्हणजे त्या हंगामात ऊस जास्त असेल तर कारखाना दोन एक आठवडे लवकर सुरु करून एखादा महिना उशिरा बंद करतात. या वर्षी तशी शक्यता आहे. बऱ्याचदा काही ऊस शिल्लक असला तरी कारखाने गाळप बंद करतात आणि काही ऊस तसाच शिल्लक राहतो. ऊस कमी असेल तरी काही कारखाने गळीत हंगाम लवकरच सुरु करतात कारण कमी ऊस असल्यामुळे कारखान्यांच्यात उसाची पळवापळवी सुरु होते. ऊस संपल्यावर गळीत हंगाम आपोआप बंद होतो.

राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम दिनांक १ नोव्हेंबर २०२३ पासून 
 राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम दिनांक १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा १४.०७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून ८८.५८ लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी कमी झाले आहे. निर्धारित केलेल्या दिनांकापूर्वी साखर कारखान्यांचे गाळप सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
 
गेल्या वर्षी राज्यात २११ साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून १०५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा मात्र उसाचे क्षेत्र घटल्याने साखर उत्पादन ८८.५८ लाख मेट्रिक टन एवढे होण्याचा अंदाज यावेळी वर्तविण्यात आला. हंगाम २०२२-२३ मध्ये साकार उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश राज्याचा क्रमांक आहे.
 
ऊस तोड कामगारांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच विविध योजनांचा लाभ देण्यासाठी साखर कारखान्यांकडून १० रुपये प्रति टन याप्रमाणे वसुली करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाला ही रक्कम देण्याचे यावेळी निर्णय झाला. या रकमेतून कामगारांच्या मुला-मुलींसाठी शाळा, वसतिगृह त्याचबरोबर कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी एफआरपीबाबत समग्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
 



Edited By -  Ratnadeep ranshoor 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

उद्धव ठाकरे यांनी देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त केली, शिवसैनिकांना दिला मोठा संदेश

LIVE: सुनेत्रा पवार गटाकडून मोठी कारवाई, अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप निलंबित

अभिजीत दीपके यांच्या आजीचे निधन

डब्ल्यूटीटी चायना स्मॅश टेबल टेनिस स्पर्धेत मानव ठक्कर आणि मनुष शाह उपांत्य फेरीत पराभूत

भारत दौऱ्यासाठी झिम्बाब्वे महिला संघ जाहीर

पुढील लेख
Show comments