मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Updated : सोमवार, 21 डिसेंबर 2020 (14:25 IST)

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2021 माहिती, नोंदणीची प्रक्रिया, उद्दिष्टे, पात्रता, फायदे जाणून घ्या

केंद्रसरकार ने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत विविध योजना सुरू केल्या जातात. आज आम्ही आपल्याला अशा योजनेबद्दलची माहिती पुरवीत आहो ज्याचे नाव महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना आहे. या लेखात आम्ही या योजनेची सर्व माहिती, योजनेचे फायदे, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, पात्रता, महत्त्वाची कागद पत्रे, अर्ज प्रक्रिया इत्यादी देत आहोत. 
 
ही योजना राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवारजी यांच्या नावाने सुरू केली गेली आहे. ही योजना त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबर 2020 रोजी सुरू करण्यात आली आहे. 
 
या योजनेच्या माध्यमातून गावाचा आणि शेतकरी बांधवांचा विकास केला जाईल. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येतील. महा विकास आघाडीने या योजनेचे नाव श्री शरद पवारजींच्या नावाने ठेवण्याचे सुचवले होते. या योजनेला मंत्रालयाकडून मान्यता दिली गेली आहे.
 
महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेच्या संयुक्त रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येईल. मनरेगाच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रोजगाराला देखील महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेशी जोडले जाईल. या योजनेला रोजगार गॅरंटी विभागा तर्फे राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आणि गावाच्या अर्थव्यवस्थेचे विकास होईल. 
 
ग्रामीण भागात गोठे आणि शेड बांधणे-
या योजनेच्या अंतर्गत गायी आणि म्हशीं साठी गोठे बांधले जातील आणि शेळ्या आणि मेंढ्यांसाठी शेड बांधले जातील. या योजनेंतर्गत पोल्ट्री शेड उघडण्यासाठी देखील सरकार मदत करेल. या योजनेचा फायदा दोन जनावरे असलेले शेतकरी बांधव देखील घेऊ शकतात. यासह मातीची गुणवत्तेत सुधार करण्यासाठी सरकार शेतकरी बांधवांची मदत देखील करेल आणि ढोरांचे मूत्र आणि शेणाला साठवून त्याला खत म्हणून वापरण्यास शेतकरी बांधवाना प्रोत्साहित केले जाईल.

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेचे उद्दिष्टे -
या योजनेचा उद्दिष्ट सर्व राज्यातील शेतकरी बांधव आणि ग्रामीण भागाचा विकास करणे आहे. या योजनेमुळे शेतकरी बांधवांचे उत्पन्नात वाढ होईल आणि गावाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल. या योजने मुळे  राज्यातील प्रत्येक शेतकरी आत्मनिर्भर बनेल आणि त्यांना रोजगार मिळेल. या योजनेच्या माध्यमाने सर्व पात्र शेतकरी बांधव सक्षम बनतील.

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृध्दी योजना 2021 चे फायदे आणि वैशिष्ट्ये -
ही योजना एनएससी प्रमुख शरद पवार जी यांच्या नावाने सुरू केली आहे. 
* या योजनेच्या माध्यमाने शेतकरी बांधव आणि गावाचे विकास केले जाईल.
* या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. 
* या योजने मुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होईल.
* महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेच्या संयुक्त रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाईल.
* या योजनेच्या माध्यमातून गावाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल.
* या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात गायी म्हशीसाठी गोठा आणि शेळ्या आणि मेंढ्यांसाठी शेड बांधले जातील.
* या योजने अंतर्गत पोल्ट्री शेड उघडण्यासाठी देखील सरकार मदत करेल.
* या योजनेचा फायदा दोन जनावरे असलेले शेतकरी बांधव देखील घेऊ शकतात.
* या योजनेच्या माध्यमाने मातीच्या गुणवत्तेला सुधारण्यासाठी सरकार मदत करेल. 
* या योजनेच्या माध्यमाने वैयक्तिक आणि सार्वजनिक कामांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येईल. 
 
महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेसाठी लागणारी पात्रता आणि महत्त्वाचे कागद पत्रे -
* अर्ज करणारा हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
* अर्ज करणारा ग्रामीण भागाचा रहिवाशी असावा.
* अर्ज करणारा शेतकरी असणे अनिवार्य आहे
.
महत्त्वाची कागद पत्रे -
* आधार कार्ड
* रेशन कार्ड
* निवास प्रमाण पत्र
* पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
* मोबाइल नंबर
* उत्पन्न प्रमाण पत्र
* मतदार ओळख पत्र.
 
अर्ज कसे करावे -
अर्ज करण्यासाठी अजून काही दिवस थांबावे लागेल. सध्या तरी या योजनेची घोषणाच सरकारने केली आहे. तपशीलवार माहितीसाठी आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया सरकार द्वारा सांगण्यात येईल. त्यासाठी थोडा काळ थांबावे लागणार आहे.