1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: सोमवार, 21 डिसेंबर 2020 (13:37 IST)

ब्रह्मा, विष्णू, महेशाचे शक्तिपुंज आहे भगवान दत्तात्रेय

Dattatreya Jayanti
देव सर्व वचनांपासून मुक्त आहे. म्हणूनच तो देव आहे. दत्त माहात्म्य ग्रंथात सांगितले आहे की देवाचे सजीव रूप सर्वीकडे आहे. ज्या प्रकारे नद्या वेग-वेगळ्या दिशेने वाहत समुद्रात मिळतात त्याच प्रमाणे आपण ईश्वर किंवा देवाची वेग-वेगळ्या रूपाने पूजा करतो. पण तो शाश्वत तत्त्व एकच आहे.
 
भगवंतापर्यंत पोहोचण्याची आणि त्याला प्राप्त करण्याची समज केवळ मनुष्यातच आहे. इतर प्राण्यांना ही समज त्याने दिलेली नाही. म्हणून भगवंताला शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षणी माणसाने केला पाहिजे.
* महागुरू दत्तात्रेय ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे शक्ती पुंज आहे. वस्तुतः देवाच्या प्रत्येक अवताराचे एक विशिष्ट कारणे असतात. महागुरू दत्तात्रेय यांच्या या अवतारात विलक्षण वैशिष्ट्याचे दर्शन घडतात.
* भगवन दत्तात्रेय समर्थ आहे.ते आपल्या भक्ताने आठवण किंवा स्मरण केल्यावर त्वरितच मदत करण्यासाठी कोणत्याही रूपात येतात. भक्ताला योग आणि मोक्ष देण्यासाठी महागुरू दत्तात्रेय समर्थ आहे.
* भगवान दत्तात्रेय यांचे वास्तव्य औदुंबराच्या झाडाखाली होते. म्हणून त्यांना औदुंबराचे झाड प्रिय आहे ते नेहमी त्याच झाडाच्या खाली वास्तव्यास असतात.
* दत्तात्रेय महोत्सवाच्या काळात दत्त चरित्राचे पारायण केल्याने ते आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी धावून जातात.
* त्यांच्यात योगींचें परम अस्तित्व असल्यामुळे त्यांना महागुरू म्हणतात. योगींचा असा विश्वास आहे की दत्त महागुरू पहाटे ब्रह्मा, माध्यान्ह श्री विष्णू आणि संध्याकाळी महेश रूपात दर्शन देतात.
* दत्त मंदिराची आरती आणि वेदमंत्राच्या शुद्ध उच्चारणाने मन आणि अंतर्मनाची शुद्धता होते.