शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (15:37 IST)

श्रीदत्तात्रेयांची अष्टके : गुरुमहिमा - गुरु हा संतकुळींचा राजा ।...

गुरु हा संतकुळींचा राजा । गुरु हा प्राणविसावा माझा । गुरुविण देव नाहीं दुजा । पाहतां त्रिलोकीं ॥१॥
गुरु हा सुखाचा सागर । गुरु हा प्रेमाचा आगर । गुरु हा धैर्याचा डोंगर । कदाकाळीं डळमळेना ॥२॥
गुरु हा सत्यालागीं साह्य । गुरु हा साधकांसी माय । गुरु हा कामधेनु गाय । भक्तांवरी दुभतसे ॥३॥
गुरुहा भक्तीचें मंडण । गुरु हा काळासी दंडण । गुरु हा करितसे खंडण । नानापरी पापाचें ॥४॥
गुरु हा वैराग्याचे मूळ । गुरु हा परब्रह्म केवळ । गुरु दाखवी तात्काळ । गांठी लिंग देहाचें ॥५॥
गुरु हा घाली ज्ञानांजन । गुरु हा दाखवी निजधन । गुरु हा सौभाग्य देऊन । स्वात्मबोध नांदवी ॥६॥
काया काशी गुरु उपदेशी । तारकमंत्र दिला आम्हांसी । बाप विठ्ठल रखुमायेसी । विठ्ठल विनवी गुरुचरणी ॥७॥