रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शनिवार, 25 जुलै 2020 (16:55 IST)

आधार कार्डाशी निगडित प्रत्येक समस्या काही सेकंदातच दूर होईल, UIDAI ने सुरू केली ही सोय ....

आधार कार्ड प्रत्येक भारतीय साठी एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. भारतीय नागरिकत्वच्या ओळखी पासून सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधारकार्डाशिवाय शासकीय योजनेशी निगडित बरीचशी कामे शक्य नाही. आधारकार्डाच्या महत्वाला बघून यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने लोकांच्या सोयीसाठी ट्विटरवर त्यांच्या समस्यांना सोडविणे सुरू केली आहेत. आता आपण ट्विटरच्या साहाय्याने आधारकार्डाशी निगडित प्रत्येक समस्येवर तोडगा मिळवू शकतात. 
 
डिसेंबर 2019 मध्ये यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया कडून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात राहणाऱ्या 125 कोटी नागरिकांसाठी आधारकार्ड बनविण्यात आले आहे. 
 
जर आपणांस आधारकार्डाशी निगडित कोणत्याही प्रकाराच्या समस्या उद्भवल्यास, यासाठी आपल्याला @UIDAI आणि @Aadhaar_Care वर जाऊन ट्विट करावं लागणार. या व्यतिरिक्त प्रादेशिक कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल देखील देण्यात आले आहे. आपण आपल्या तक्रारी इथे देखील नोंदवू शकता. 
 
आधाराशी निगडित प्रत्येक सुविधा आता ऑनलाईन: आधाराशी निगडित प्रत्येक सुविधा आता ऑनलाईन केल्या आहेत. आधारकार्डामध्ये नावं बदलण्यापासून फोन बदलण्यापर्यंत किंवा कोणत्याही प्रकारची इतर माहिती ऑन लाइन मिळू शकते. या व्यतिरिक्त आधार कार्ड मध्ये काहीही सुधारणा करावयाची असल्यास ते ही आपण ऑन लाइन करवू शकता.
 
UIDAI च्या ग्राहक सेवा नंबर 1947 वर फोन लावून आधाराशी निगडित प्रत्येक माहिती मिळवू शकता. या व्यतिरिक्त [email protected] या संकेत स्थळांवर आपण ईमेल देखील पाठवू शकता.  
 
जानेवारीमध्ये सुरू झालेली चॅटबोट सुविधा : या पूर्वी या वर्षी जानेवारी मध्येच UIDAI ने Ask Aadhaar Chatbot वर लोकांच्या प्रश्नाचे उत्तर दिले जातात. इथे आधाराशी निगडित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर त्वरित मिळतात. चॅटबोट एक सॉफ्टवेयर अँप्लिकेशन आहे, जे इंटरफेस प्रमाणे काम करतं. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने प्रश्नांचे उत्तर देतं.