रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By वृजेंद्र सिंह झाला|
Last Modified: मंगळवार, 2 जून 2020 (07:37 IST)

यकृत बिघडण्यामागील कारणे, तज्ज्ञांचा सल्ला

यकृत म्हणजे लिव्हर हे एखाद्या स्पॉंज सारखा शरीराचा नाजूक अंग असून यात बिघाड झाल्यास शरीराच्या संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. यकृताच्या आजाराचे वेळशीर उपचार न केल्याने ते एक गंभीर समस्या बनू शकते. अखेर यकृताच्या आजाराचे लक्षण काय आहे आणि त्यापासून कसे वाचू शकतो हे वेबदुनियाच्या वाचकांसाठी  सांगत आहे मेदांता मेडिसिटी गुडगावचे प्रख्यात लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. प्रशांत भांगी.
 
कारणे : आंतरराष्ट्रीय लिव्हर ट्रान्सप्लांट संस्थेचे सदस्य डॉ. प्रशांत भांगी सांगतात की यकृताचे आजार कोणत्याही वयोगटातील असू शकतात. तब्बल 70 टक्के प्रकरणे हिपॅटायटीस, हिपॅटायटीस बी आणि सी मुळे होतात. पण भारतात हिपॅटायटीस सी मुळे जास्त आढळतात. जास्त मद्यपान केल्याने आणि जास्त काळ मद्यपान केल्याने यकृत खराब होते. 30 टक्के प्रकरणांमध्ये यकृताच्या समस्येच्या मागे आपली राहणीमान आणि खाण्यापिण्याचा सवयी आहेत. मुलांमध्ये हा आजार जीन आणि एंझाइम डिफेक्टमुळे होतो.
 
लक्षणे : वर्ष 2016 मध्ये बेस्ट रिसर्च वेनगार्ड अवॉर्ड ने सन्मानित डॉ. भांगी म्हणतात की सुरुवातीच्या काळातच काळजी घेतल्यास यकृताच्या आजारापासून सुटका मिळवता येतो. शेवटी तर औषधे देखील काम करणे बंद करतात. अश्या परिस्थितीत यकृताचे प्रत्यारोपणच हा एकमेव पर्याय आहे. ते म्हणतात की पायांवर सूज येणे, पोटात पाणी तयार होणं, रक्ताच्या उलट्या होणे, शरीरांतर्गत रक्तस्त्राव होणं हे सर्व लक्षण यकृताच्या आजारांशी निगडित आहे.
 
कसे टाळावे : गोव्यातील राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू असलेले डॉ. प्रशांत सांगतात की खराब जीवनशैलीमुळे एखाद्या व्यक्तीला यकृतावर चरबी जमण्याचा त्रासाला सामोरा जावं लागतं. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये सुधार केल्यास, दररोज सकाळ संध्याकाळ दोन- दोन किलोमीटर पायी चालल्यास या समस्येपासून सुटका मिळवता येईल. फास्ट फूड, तळलेले, गरिष्ठ मसाल्याच्या पदार्थाचे सेवन करणं टाळल्याने यकृत देखील निरोगी राहील आणि यकृताच्या प्रत्यरोपणाची गरजच येणार नाही. 
 
यकृताचे कर्करोग : युरोपियन सोसायटी फॉर ऑर्गन ट्रांसप्लांटचे सदस्य डॉ. भांगी म्हणतात की 90 टक्के प्रकरणामध्ये यकृताचे कर्क रोग खराब झालेल्या यकृतामध्येच होतात. 10 टक्के प्रकरणे अशी आहेत जेव्हा सामान्य यकृतामध्ये ट्युमर आढळतात. 
ते म्हणतात की यकृताच्या प्रत्यारोपणाने यकृताच्या कर्करोगाचे देखील उपचार होऊन जातात. या बाबतची जनजागृती करायला हवी. जेणे करून लोकांमध्ये निराशा येऊ नये. फ्रान्स मध्ये सुपर वैशिष्ट्यचे प्रशिक्षण घेतलेले डॉ. भांगी सांगतात की त्यांना तिथे बरेच काही शिकायला मिळाले. उपचारादरम्यान योग्य रुग्णाची निवड करणे महत्त्वाचे असते. जेणे करून योग्य परिणाम मिळतात.
स्वस्त उपचार : तंत्रज्ञानाने उपचार करणे महाग झाले आहेत. अशाने सामान्य माणसाला स्वस्त उपचार कसे काय मिळणार ? या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. भांगी म्हणतात की यकृताचा प्रत्यरोपणामध्ये आधी 18 ते 21 लक्ष रुपये खर्च होत होते. आता देखील तेवढेच खर्च होतात. यकृताच्या प्रत्यरोपणाची शल्यचिकित्सा बहुधा कार्पोरेट रुग्णालयातच होते. एम्स सारख्या शासकीय रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध नाही. शासकीय पाठिंब्याशिवाय स्वस्त उपचार करणे शक्य नाही. 
 
काय खावे : यकृताला बऱ्याच काळ निरोगी ठेवण्यासाठी गरजेचे आहे निरोगी जीवनशैली बरोबरच खाणे-पिणे देखील चांगलेच असावं. आहारात जास्त प्रमाणात हिरव्या पालेभाज्या वापरल्या पाहिजेत. पालक, ब्रोकोली, कोबी, मोहरी, मुळा त्याच बरोबर अंकुरलेले मूग, गहू, इत्यादी वापरण्यात घेऊ शकतो. अन्नामध्ये आलं, लसणाचा वापर नियमाने करावा.