रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Updated : गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (11:34 IST)

मोबाइल चोरीला गेला किंवा गहाळ झाल्यावर काय करावे ?

मोबाइल गहाळ होणे, चोरीला जाणे अश्या घटना वारंवार घडत असतात. पोलिसात तक्रार करून देखील काहीही होत नाही. पोलिस आपली तक्रार देखील व्यवस्थित नोंदणी करून घेत नाही. काही दिवस आपण अस्वस्थ होऊन निराश होऊन जाता. अश्या परिस्थिती काही राज्यांनी ऑनलाईन एफआयआर नोंदणी करण्याची सुविधा दिली आहे. 
 
या व्यतिरिक्त बरेच पोलीस ऍप्स सुरू आहे. ज्यामध्ये मोबाइल गहाळ झाल्याची तक्रार नोंद करता येते. यासाठी आयएमईआय नंबर, ई मेल आय डी, मोबाइल नंबर,पत्ता आणि मोबाइल संबंधी इतर माहिती द्यावी लागते.

 
आपण आपली तक्रार राज्य पोलीस विभागाच्या वेबसाइट वर जाऊन तक्रार नोंदणी करू शकता. आपण काही सोप्या पद्धतीने तक्रार नोंदवू शकता. आज आपण जाणून घेऊ या की मोबाइल गहाळ झाल्यावर किंवा चोरी झाल्यावर काय करावे....
 
काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत :
1  आयएमईआय नंबर : नवा मोबाइल विकत घेताना सर्वप्रथम त्याच्यावर दिलेला आयएमईआय नंबर आपल्या डायरीत नोंद करून घ्यावा. मोबाइल गहाळ किंवा चोरी गेल्याचा स्थितीत हे अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरतं.
 
2 नेटवर्क ऑपरेटरशी त्वरित संपर्क करणे : नेटवर्क ऑपरेटरशी त्वरित संपर्क करावे आणि त्यांना सांगून आपली सिम बंद करावी. जेणे करून आपल्या सिमचा गैर वापर कोणी करू शकत नाही. त्या मागचे कारण असे की आपल्या सर्व क्रेडिट, डेबिट कार्ड आणि बँकेचे खाते त्या नंबरशी संलग्न असतात. त्याचा कोणीही वापर करू शकतो. 
 
3 सर्व पासवर्ड बदलणे : जीमेल, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअॅप, हे सगळे मोबाइलच्या सिम वरून चालवले जाते. या साठी गरजेचे आहे की आपले पासवर्ड बदलून आपला डेटा सुरक्षित ठेवणे. 
 
4 तक्रार नोंदणी देणे : ऑनलाईन तक्रार नोंदविल्यावर ज्या भागात मोबाइल गहाळ किंवा चोरी झाला आहे तिथल्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवून एफआयआर  नोंदवल्याची छायाप्रत अवश्य घ्या. त्यानंतरच एफआयआरची स्थिती स्पष्ट होऊ शकते.
 
5 आपल्या बँक किंवा आपल्या क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क साधणे : आपले बँकेच्या व्यवहारासंबंधित डेटा, खाते क्रमांकाविषयी माहिती, आपली बँक, क्रेडिट कार्ड असलेल्या कंपनीची माहिती, यात वापरला जाणारा पासवर्ड या संबंधित माहिती बँकेस देऊन त्वरित सर्व व्यवहार थांबवावे नाही तर कोणीही त्याचा गैर वापर करू शकतो.