रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By

साजरा करा 'व्हॅलेंटाइन वीक'

7 फेब्रुवारी 
रोज डे : मन जोडणारे फुल!
प्रियकर-प्रेयसीसाठी तसा प्रत्येकच दिवस प्रेमाचाच असतो. पण तरी देखील व्हॅलेंटाइन डेचे एक वेगळे महत्त्व आहे. आपल्या जोडीदाराला या दिवशी फूल दिले तर मग काय बहार येते. प्रेमाची आठवण म्हणून या दिवशी फूल दिले जाते. फुले मन जोडतात. म्हणून तर एखाद्या रूग्णालाही भेटण्यासाठी जाताना फूलच का देतात? फुल देण्यामागचा अर्थ काय? यातून काय संदेश मिळतो? हे जाणून घेऊ आणि आपणही रंगीबिरंगी गुलाबांसोबत व्हॅलेंटाइन डे साजरा करू या.
 
8 फेब्रुवारी 
प्रपोज डे : फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशन
काय? तुम्हाला कुणाला प्रपोज करायचंय! मग 'व्हॅलेंटाइन डे' ची वाट बघताय? अरे हो, तो तर जागतिक प्रेम दिन! नाही का? तोपर्यंत थांबलात तर चला ठीक आहे. पण ती तोपर्यंत थांबली पाहिजे ना! अरे घाईघाईत कुठे चाललात? 'प्रपोज' करायला? अरे थांबा थांबा, अभ्यास न करता कुठे देताय परीक्षा! तुम्ही म्हणत असाल, प्रपोज करण्यासाठी अभ्यासाची काय गरज? तुमचा हा अतिउत्साह महागात पडू शकतो. 'उचलली जीभ अन् लावली टाळ्याला' असं प्रेमात करून चालत नाही! प्रत्येक शब्द तोलून मोलून वापरावा लागतो. गोंधळून चालत नाही. 'फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशन' हे तत्त्व लक्षात ठेवा.
 
9 फेब्रुवारी
चॉकलेट दिवस (चॉकलेट डे)
काही गोड होऊन जाऊ दे, कारण कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी तोंड गोड केले पाहिजे म्हणूनच चॉकलेट डे साजरा केला जात असावा. चॉकलेट डे व्हॅलेंटाइन आठवड्याचा तिसरा दिवस असतो जो प्रत्येक वर्षी 9 फेब्रुवारीला फारच जुनून आणि आनंदाने सर्व वयाचे लोक खास करून युवा, युगल आणि मित्रांसोबत संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. चॉकलेट डे सर्वांचा आवडता दिवस असतो कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजन, मित्र, व्हॅलेंटाइन इत्यादींसोबत चॉकलेटचा डब्बा देणे आणि घेणे पसंत करतो. या देशातील युवा एकमेकांना चॉकलेट देऊन हा दिवस साजरा करतात. 
 
10 फेब्रुवारी : टेडी डे 
जोडपे आणि युवा व्हॅलेंटाइन आठवड्याच्या या सणाला फारच सुंदररीत्या साजरा करतात. या दिवशी लोक आपल्या आवडत्या लोकांना सुंदर टेडी (Teddy)गिफ्ट करून आपल्या प्रेमाची जाणीव करून देतात. आपल्या प्रेमाची जाणीव करून देणारा टेडी आपली बायको, पार्टनर, नवरा आणि इतर आवडीच्या लोकांना देऊ शकतो. तसे तर मुलींना टेडी फार पसंत असतात आणि मुलांना देखील लोक टेडी बिअर गिफ्ट म्हणून देतात.
 
11 फेब्रुवारी : प्रॉमिस डे 
प्रेम नेमही जबाबदारी आणि प्रामिसने केला जातो. या दिवशी एक नवीन प्रॉमिस करा आणि जुने प्रॉमिस पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. या दिवशी आपल्या पार्टनरला तेच प्रॉमिस करा जे तुम्ही पूर्ण करू शकता.  
12 फेब्रुवारीला : हग डे 
प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे, याहून अधिक सुख काय असेल. त्याच्या कुशीत सर्व संसाराचे सुख, आनंद, आपुलकी, विश्वास, अतूट बंधन, आणि सुरक्षेचे भावना येते. परंतू या सर्व भावना व्यक्त होण्यासाठी पार्टनरला हग करण्यापूर्वी या टिप्स अमलात आणावे:
* आधी नजरा मिळवून जरा स्मित करा आणि मग हग करा.
* हग अधिक टाईट किंवा लूज नसावे.
* हग अधिक वेळासाठी असावे.
*आधी स्वत: हग लूज करण्याची पुढाकार घेऊ नये.
*मुलींनी गळ्यात हात टाकून हग केले पाहिजे.
*मुलांनी कंबरेत हात टाकून हग केले पाहिजे.
 
13 फेब्रुवारी : किस डे 
व्हॅलेंटाइनच्या एक दिवस आधी किस डे येतो. हा डे जग भरात वेग वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. या दिवशी आपल्या जोडीदाराला किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही प्रेम करता त्याला किस करा, पण हो त्याच्यासाठी माउथ फ्रेशनर खाणे विसरू नका. 
 
14 फेब्रुवारी : वेलेंटाइन डे 
आता येतो एक स्पेशल दिवस, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीला आपले प्रेम प्रदर्शित करता. या दिवशी त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि प्रेमाच्या गोष्टी करा.