शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 4 फेब्रुवारी 2019 (11:52 IST)

बॉलिवूडचे नवे लव्हबर्डस्‌

सारा अली खानने बॉलिवूडमध्ये केदारनाथ या चित्रपटाद्वारे डेब्यू केले होते. या चित्रपटात तिचा सहकलाकार होता सुशांत सिंग राजपूत. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती, परंतु आता वास्तव आयुष्यातही ही जोडी गुटर्गू करत असल्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, 21 जानेवारी रोजी सुशांत सिंग राजपूतचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सारा खास डेहराडूनवरून परत आली. सुशांतचा हा दिवस खास ठरवण्यासाठी साराबरोबर केकही घेऊन आली होती. दोघेही त्यानंतर डीनर डेटवर गेले होते. सारा व सुशांतची ही खास केमिस्ट्री पाहून हे दोघे बॉलिवूडचे नवे लव्हबर्डस्‌ बनल्याची चर्चा सुरू झाली आहे. या दोघांच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले, तर सुशांत सोनचिडिया या चित्रपटाध्ये दिसून येणार आहे, तर सिंबानंतर साराचा आगामी प्रोजेक्ट काय असणार याविषयी आप काहीही खुलासा झालेला नाही.