मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 (13:44 IST)

सध्या नेटकर्‍यांमध्ये चर्चेत

bobby aaryan deol
नुकताच अभिनेता बॉबी देओलने त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला. बॉबीने वाढदिवशी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला, जो नेटकर्‍यांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या मुलासोबतचा बॉबीने शेअर केलेला हा फोटो आहे. 49 वर्षांचा प्रवास अप्रतिम होता. 50 वे वर्ष याहूनही चांगले असेल. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आभार. माझ्यात माझ्या मुलाने मित्र शोधला आहे. पुढचे सर्व आयुष्य असेच तुम्हा सर्वांसोबत जाईल अशी आशा करतो, असे कॅप्शन देत 17 वर्षीय आर्यानसोबतचा फोटो बॉबीने शेअर केला आहे. सध्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंटस्‌चा पाऊस पडत आहे. नेटकर्‍यांना आर्यान एवढा आवडला की त्याला अनेकांनी बॉलिवूड पदार्पणाचा सल्ला दिला आहे. तर काहींनी मुलासोबत 'सोल्जर 2' चित्रपट बनव असेही म्हटले आहे. रुपेरी पडावर आर्यानने यावे अशी इच्छा अनेकांनी बोलून दाखवली आहे. आता चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार का हे आगामी काळातच स्पष्ट होईल. सलमान खानच्या आगामी 'भारत'मध्ये बॉबी झळकणार आहे. बॉबीने या चित्रपटासाठी चांगलीच कंबर कसली असून तो सध्या जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे.