शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By

अक्षय तृतीयावर धन प्राप्तीसाठी 6 सोपे उपाय

धन संपत्तीचा संबंध वास्तू शास्त्राशी असतं. कोणत्याही मनुष्यावर त्याभोवती असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो. जाणून घ्या काही उपाय जे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर कशी प्रसन्न होते बघा: 

1. लग्न राशीच्या ‘स्वामी ग्रह’ करा प्रसन्न: प्रत्येक जातकाची एक चंद्र राशी असते आणि या प्रकारेच जन्मापासून संबंधित एक लग्न राशी असते. जातकाचे गुण आणि व्यवहारावर लग्न राशी प्रभाव टाकते. जर आपल्या कामांमध्ये अडथळे येत असतील किंवा आर्थिक रूपाने परेशान असाल तर आपल्या लग्न राशीच्या ‘स्वामी ग्रह’ च्या अनुकूल रंगाची एखादं वस्तू नेहमी स्वत:जवळ असू द्या. किंवा त्या रंगाचा रुमालही जवळ ठेवू शकता.
 
2. अलमारी योग्य ठिकाणी ठेवा: पैसे ठेवण्याची अलमारी, उत्तर दिशेच्या खोलीत दक्षिण भिंतीवर लागलेली असल्यास धन वृद्धी लाभ देते.
 
3. मुख्य दारावर दिवा लावा: दररोज सकाळी लक्ष्मी पूजन करायला हवे आणि सायंकाळी मुख्य दाराच्या उजवीकडे तुपाचा दिवा लावायला हवा. हे दोन्ही कार्य केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते.

4. घराच्या मुख्य दारावर गणपती: गणपतीचा फोटो किंवा मूर्ती घरातील मुख्य दारावर लावल्याने घरात धन संबंधी समस्या सुटतात. अशाने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही.
 
5. घरात तुळस लावा: तुळस लावून नियमित झाडाला पाणी दिल्याने कधीच धन-धान्याची कमी भासत नाही.
 
6. गायीला चारा खाऊ घाला: रोज सकाळी स्नान केल्यानंतर गायीला हिरवा चारा किंवा कणीक किंवा पोळी खाऊ घालावी. याने लक्ष्मी प्रसन्न होते.
 
 
- श्रीरामानुज