शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By
Last Updated : सोमवार, 25 एप्रिल 2022 (12:08 IST)

अक्षय तृतीयेला सोनं विकत घेता येत नसल्यास केवळ 5 रुपये खर्च करा, अक्षय पुण्याची प्राप्ती होईल

Akshaya Tritiya Festival
अक्षय तृतीया सर्वात प्रसिद्ध मुहूर्त मानले जातात. जसं दिवाळीला लक्ष्मी कृपा प्राप्तीचा दिवस मानला जातो, त्याच प्रमाणे अक्षय तृतीयेलाही लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठीचे काही प्रयत्न केले पाहिजे.
 
लॉक डाऊन मुळे आपणं सोनं विकत घेऊ शकत नसल्यास निराश होऊ नका घरात फक्त 5 रुपयाच्या या काही 5 वस्तू ठेवल्यास आपल्याला शुभता मिळू शकते.
 
1 मातीचा दिवा : चिकणमातीचे महत्व सोन्यासारखेच आहे. जर आपणं सोनं विकत घेऊ शकत नाही तर अक्षय तृतीयेवर मातीचे कोणतेही भांडे किंवा मातीचा दिवा देखील घरात शुभता आणू शकते.
 
2 फळे : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तांमध्ये हंगामी रसाळ फळे ठेवणे देखील चांगले आहे. कमी किमतीतपण आपणं चांगली फळे ठेऊ शकता.
 
3 कापूस : अक्षय तृतीयेवर 5 रुपयाचे कापूस पण ठेवू शकता.
 
4 सेंधव मीठ : अक्षय तृतीयेवर घरात सेंधव मीठ ठेवणे शुभ असते. पण लक्षात ठेवावे की या सेंधव मीठाचा वापर खाण्यासाठी करू नये.
 
5 पिवळी मोहरी : एक मूठभर पिवळी मोहरी ठेवल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो.