मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By
Last Modified: सोमवार, 18 एप्रिल 2022 (16:45 IST)

Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीया कधी? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा विधी आणि मंत्र

Akshaya Tritiya 2022 अक्षय तृतीया 2022 : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया एक शुभ मुहूर्त आणि महत्त्वाची तिथी मानली जाते. अक्षय्य तृतीयेच्या सणाला आखा तीज म्हणतात. हा उत्सव दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या तिथीला सर्व प्रकारचे शुभ कार्य करता येतात. अक्षय्य तृतीयेला खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यावेळी हा उत्सव 3 मे रोजी आहे.
 
अक्षय्य तृतीयेची पूजा पद्धत
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी व्रत ठेवावे. सूर्योदयापूर्वी स्नान करावे. नंतर पिवळे कपडे घाला. घरातील मंदिरात विष्णूच्या मूर्तीला गंगाजलाने शुद्ध करावे. पिवळी फुले आणि तुळशीला देवाला अर्पण करावी. आता दिवा आणि अगरबत्ती लावा आणि आसनावर बसावे आणि विष्णु चालिसा किंवा विष्णु सहस्त्रनाम पाठ करावा. शेवटी श्रीहरीची आरती करावी.
 
अक्षय्य तृतीया पूजा मंत्र
ऊँ नमो भाग्य लक्ष्म्यै च विद्महे अष्ट लक्ष्म्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्।।
 
अक्षय्य तृतीया महत्त्व
अक्षय्य तृतीयाचे मुहूर्त सर्वात शुभ मुहूर्त मानले जाते. या दिवशी पंचांग न पाहता शुभ कार्य करता येते. या दिवशी विवाह, गृहप्रवेश, कपडे व दागिन्यांची खरेदी, घर, वाहन आदी गोष्टी करता येतात. 
 
ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पितरांना केलेले तर्पण आणि पिंडदान फलदायी असते. पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते.