गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 मे 2021 (08:48 IST)

Akshaya Tritiya Puja Vidhi : अक्षय तृतीयेला घरात सोप्या पद्धतीने करा पूजा

Akshaya Tritiya shubh muhurat
अक्षय तृतीया सर्वात सिद्ध मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी भाविक भगवान विष्णूंची पूजा करतात.‍ स्त्रिया आपल्या आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी उपवास करतात. या दिवशी काही सोप्या पद्धतीने पूजा करुन देवाला प्रसन्न केले पाहिजे.
 
या दिवशी ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून स्नानादि करुन श्री विष्णू आणि माँ लक्ष्मीच्या मूर्तीवर अक्षता अर्पित कराव्या. शांत मनाने पांढर्‍या कमळाची फुले किंवा पांढरे गुलाब, धूप-उदबत्ती, आणि चंदन इत्यादी सामुग्रीने पूजा करावी. गहू किंवा सत्तू, काकडी, हरभरा, याचं नैवेद्य दाखवावं. या दिवशी ब्राह्मणांना अन्न दान करुन त्यांचा आशीर्वाद प्राप्त करावं. तसेच या ‍दिवशी फळं, भांडी, कपडे, गाय, जमीन, पाण्याने भरलेले घडे, पंखे, तांदूळ, मीठ, तूप, खरबूज, साखर, हिरव्या भाज्या इत्यादी दान करणे चांगले मानले जाते.
 
या दिवशी विष्णू सहस्रनामाचा जप करावा. सर्वात शेवटी तुळशीला जल ‍अर्पित करावे आणि श्रद्धापूर्वक आरती करावी. मातीच्या लहान मटक्यात पाणी भरून ठेवावे त्यावर खरबूज ठेवावे आणि पूजा केल्यानंतर सवाष्णीला याचे दान द्यावे.
 
या व्यतिरिक्त या दिवशी दान देण्याचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी शुभ संयोग आहे त्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या तिथी दान करून अक्षय फळ प्राप्त करू शकतात. या दिवशी देव, ऋषी, पितरांसाठी ब्रह्म यज्ञ, पिंड दान आणि अन्न दान करावे. या दिवशी पाण्याच मटके दान करावे. तसेच या तिथीला जव, गहू, सातू, तांदूळ, मातीचे मडके, फळ दान करणे शुभ ठरेल. या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे.
 
अक्षयतृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुण्य मिळते. याने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो. 
 
अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. या मुहूर्तावर रोवल्यास वनस्पतींचा क्षय होत नाही.

स्त्रियांसाठी अक्षय तृतीया हा दिवस महत्त्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरीचे या दिवशी त्यांना विसर्जन करायचे असते. त्यानिमित्त त्या हळदीकुंकूही करतात.
 
दान व्यतिरिक्त या दिवशी स्वत:साठी खरेदी करुन त्याची पूजा केल्याने देखील यश आणि भाग्य नेहमी साथ देतं. म्हणून या दिवशी लोक जमीन, जायदादसंबंधी किंवा शेअर मार्केट संबंधी तसेच रीअल इस्टेटमध्ये गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करणे यात विश्वास ठेवतात. अनेक लोक या दिवशी गृह प्रवेश, तसेच मंगळ कार्य करणे शुभ 
 
समजात. या दिवशी वाहन आणि दागिने खरेदी करणे देखील शुभ ठरतं कारण या दिवशी केलेल्या कामात बरकत येते. म्हणून या दिवशी चांगले कर्म करावे. दान-पुण्य करावे कारण ज्या प्रकारे चांगल्या कामाचे चांगले परिणाम तसेच वाईट कामाचे वाईट परिणाम मिळतात. म्हणून या दिवशी जरा सांभाळून वागावे.