शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (11:17 IST)

Akshaya Tritiya 2021 : सोना खरेदी करणे शक्य नसेल तर 5 रुपये खर्च करुन देखील शुभ परिणाम हाती लागतील

अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी केलेले पुण्य कधीच क्षीण होत नाही. दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया साजरी केले जाते. जसं दिवाळी हा दिवस लक्ष्मी कृपा प्राप्तीचा दिवस मानला जातो, त्याच प्रमाणे अक्षय तृतीयेलाही लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठीचे काही प्रयत्न केले पाहिजे.
 
सध्याच्या परिस्थितीमुळे जर आपणं सोनं विकत घेऊ शकत नसल्यास निराश होऊ नका घरात फक्त 5 रुपयाच्या या काही 5 वस्तू खरेदी करुन पूजेत ठेवल्यास आपल्याला शुभता मिळू शकते.
 
1 मातीचा दिवा : चिकणमातीचे महत्व सोन्यासारखेच आहे. जर आपणं सोनं विकत घेऊ शकत नाही तर अक्षय तृतीयेवर मातीचे कोणतेही भांडे किंवा मातीचा दिवा देखील घरात शुभता आणू शकते.
 
2 फळे : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तांमध्ये हंगामी रसाळ फळे ठेवणे देखील शुभ ठरतात. कमी किमतीत पण आपणं चांगली फळे ठेऊ शकता.
 
3 कापूस : अक्षय तृतीयेवर 5 रुपयाचे कापूस पण ठेवू शकता.
 
4 सेंधव मीठ : अक्षय तृतीयेवर घरात सेंधव मीठ ठेवणे शुभ असतं. पण लक्षात ठेवा की या सेंधव मीठाचा वापर खाण्यासाठी करू नये.
 
5 पिवळी मोहरी : एक मूठभर पिवळी मोहरी ठेवल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो.
 
या वस्तू खरेदी करायले जाणे शक्य नसेल तर घरातील वस्तू शुद्ध करुन देखील वापरु शकता.
 
अक्षय तृतीया शुभ मुहूर्त
 
तृतीया तिथी आरंभ: 14 मे 2021 प्रात: 05:38 मिनिनटापासून
तृतीया तिथी समापन: 15 मे 2021 प्रात: 07:59 मिनिटापर्यंत
अक्षय तृतीया पूजा मुहूर्त: प्रात: 05:38 मिनिटापासून ते दुपारी 12:18 मिनिटापर्यंत
अवधि: 06 तास 40 मिनिट