Varuthini ekadashi 2021: वरुथिनी एकादशी व्रत पूजा विधी, नियम आणि फळप्राप्ती

ekadashi
Last Modified सोमवार, 3 मे 2021 (13:51 IST)
एका महिन्यात 2 एकादशी असतात आणि वर्षात 365 दिवसात फक्त 24 एकादशी असतात. अधिकमासामुळे दर तिसर्‍या वर्षी एकूण 26 एकादशी असतात. प्रत्येक एकादशी व्रताचे नाव आणि फळ शास्त्रात दिले आहेत. आज आपण जाणून घ्या वरुथिनी एकादशीने व्रताचे महत्त्व, पूजा विधी आणि ‍नियम. ही एकादशी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला येते.
वरुथिनी एकादशी व्रत मुहूर्त :
- 7 मे 2021 वार शुक्रवार
- वरुथिनी एकादशी पारणा मुहूर्त: 05:35:17 ते 08:16:17 पर्यंत 8 मे रोजी
- अवधि : 2 तास 41 मिनिटे
- एकादशी तिथी आरंभ - 06 मे 2021 दुपारी 02 वाजून 10 मिनिटापासून ते एकादशी तिथी समाप्त- 07 मे 2021 ला संध्याकाळी 03 वाजून 32 मिनिटापर्यंत
- द्वादशी तिथी समाप्त- 08 मे ला संध्याकाळी 05 वाजून 35 मिनिटावर
- एकादशी व्रत पारण वेळ- 08 मे सकाळी 05 वाजून 35 मिनिटापासून सकाळी 08 वाजून 16 मिनिटापर्यंत
पारणाच्या अवधी- 2 तास 41 मिनिटे

पूजन विधी :
1. दशमी तिथीला रात्री सात्विक भोजन करावं.
2. एकादशी व्रत दोन प्रकारे करता येतं. एक तर निर्जला किंवा फळाहार करुन.
3. एकादशी तिथीला सकाळी सूर्योदयापूर्वी उठून नित्य कार्य आटपून अंघोळ करावी. नंतर व्रत संकल्प घ्यावं.
4. त्यानंतर अक्षता, दीपक, नैवेद्य इत्यादी सोळा पदार्थांनी विधिवत भगवान विष्णूंची पूजा करावी.
5. मग घराजवळ एखादे पिंपळाचे झाड असल्यास त्याची पूजा करुन त्याच्या मुळामध्ये कच्चे दूध अर्पण करावं व तूपाचा दिवा लावावा.
6. शक्य नसेल तर तुळशी पूजन करावं. पूजा करताना ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपत राहावं.
7. नंतर रात्री देखील भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी.
8. दिवसभर विष्णूंचे स्मरण करत राहावे तसंच रात्री पूजा स्थळी जागरण करावे.
9. एकादशीच्या दुसर्‍या दिवशी द्वादशीला व्रत सोडावे. हे व्रत पारण मुहूर्तावर सोडावे. व्रत सोडल्यावर ब्राह्मण किंवा एखाद्या गरीब माणसाला अन्न द्यावे.
व्रताचे नियम :
कांस्यं मांसं मसूरान्नं चणकं कोद्रवांस्तथा।
शाकं मधु परान्नं च पुनर्भोजनमैथुने।।
- भविष्योत्तर पुराण

1. या दिवशी कांस्य भांड्यात अन्न खाऊ नये.
2. उपास करत नसला तरी मांस आणि मसूर खाऊ नये.
3. चणे किंवा कोदो भाज्यांचे सेवन करु नये. सोबतच मधाचे सेवन करणे निषिद्ध मानले जाते.
4. एकाच वेळी फळाहार करावा.
5. या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नये.
6. या व्यतिरिक्त विडा खाणे, दात घासणे, मीठ-तेल किंवा अन्नाचे सेवन वर्जित मानले गेले आहे.
7. या दिवशी जुगार खेळणे, क्रोध करणे, खोटे बोलणे किंवा इतरांची निंदा करणे योग्य नाही. कुसंगती टाकून द्यावी.
व्रताचे फळ:
1. वरुथिनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी, पापांचा नायपाट करणारी आणि मोक्ष प्रदान करणारी आहे.
2. वरुथिनी एकादशीचे फळ दहा हजार वर्षांपर्यंत तप करण्यासमान आहे.
3. वरुथिनी एकादशी व्रत पालन करणे म्हणजे कुरुक्षेत्रात सूर्यग्रहण दरम्यान एक मन स्वर्णदान करण्यासमान आहे.
4. वरूथिनी एकादशी व्रत केल्याने मनुष्य या लोकात सुख भोगून परलोकात स्वर्गाला पोहचतो.
5. शास्त्रांमध्ये अन्नदान आणि कन्यादान हे सर्वात मोठे दान असल्याचे मानले गेले आहे. वरुथिनी एकादशीच्या व्रताने अन्नदान आणि कन्यादान या दोघांनाही समान फळ मिळते.
6. या व्रताचे महात्म्य वाचल्यास हजार गायींचा दान केल्याचे पुण्य लाभतं. याचे फळ गंगा स्नानापेक्षा अधिक असल्याचे समजले जाते.
7. या दिवशी खरबूज दान करावे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

परिवर्तिनी एकादशीचे महत्व आणि व्रत विधी

परिवर्तिनी एकादशीचे महत्व आणि व्रत विधी
हिंदू धर्मात एकादशीचे विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. दर ...

Dol Gyaras : का साजरी केली जाते डोल ग्यारस, महत्व जाणून

Dol Gyaras : का साजरी केली जाते डोल ग्यारस, महत्व जाणून घ्या
कृष्ण जन्माष्टमीनंतर येणाऱ्या एकादशीला डोल ग्यारस म्हणतात. श्री कृष्णाच्या जन्माच्या ...

Mandir Mystery : या मंदिरातील खांबांमधून येतो गाण्यांचा ...

Mandir Mystery : या मंदिरातील खांबांमधून येतो गाण्यांचा आवाज, रहस्य उलगडण्यासाठी इंग्रजांनी कापला होता खांब
1. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट: विरुपाक्ष मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा ...

Ganesh Chaturthi 2021: असुरांचा राजा गजमुख कसा बनला उंदीर? ...

Ganesh Chaturthi 2021: असुरांचा राजा गजमुख कसा बनला उंदीर? जाणून घ्या बाल गणेशाची ही रोचक कथा
Ganesh Chaturthi 2021: सनातन संस्कृतीत अनेक देवता आहेत. यामध्ये गणपतीची प्रथम आराधना ...

Anant Chaturdashi 2021: अनंत चतुर्दशी व्रत शुभ मुहूर्त, ...

Anant Chaturdashi 2021: अनंत चतुर्दशी व्रत शुभ मुहूर्त, पूजा विधि आणि व्रत कथा
भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत आहे. यावेळी हे व्रत 19 ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...