गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 (12:42 IST)

षटतिला एकादशी पौराणिक व्रत कथा

shattila ekadashi katha
एकदा नारदाने प्रभू विष्णूंना षटतिला एकादशी कथा संबंधित प्रश्न विचारला तेव्हा प्रभूंनी षटतिला एकादशी माहात्म्य सांगितले ते ऐकावे-
 
भगवंतानी नारदांना म्हटले की - हे नारद! मी आपल्याला सत्य घटना सांगत आहोत. लक्ष देऊन ऐकावे.
 
प्राचीन काळात मृत्युलोकात एक ब्राह्मणी राहत होती. ती नेहमी व्रत करत असे. एकेकाळी ती एक महिन्यापर्यंत व्रत करत होती ज्याने तिचं शरीर अत्यंत कमकुवत झाले. ती अत्यंत हुशार असूनही, तिने देवता किंवा ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते. यामुळे मी विचार केला की या ब्राह्मणीने व्रत करुन आपलं शरीर शुद्ध केले आहे तर आता तिला विष्णुलोकात जागा तर मिळेल परंतू हिने कधी अन्न दान न केल्यामुळे ही तुप्त होणे अवघड आहे.
 
प्रभू म्हणाले की- असा विचार करुन मी भिकार्‍याच्या वेषात मृत्युलोकात त्या ब्राह्मणीजवळ गेलो आणि भिक्षा मागितली.
 
तेव्हा ब्राह्मणी म्हणाली- महाराज आपण का आले आहात?
मी म्हटले की- मला भिक्षा पाहिजे.
यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षापात्रात टाकला. मी स्वर्ग लोकात परतून आलो.
 
काही काळानंतर ती ब्राह्मणी शरीर त्याग करुन स्वर्ग आली. तेव्हा ब्राह्मणीला माती दान केल्यामुळे स्वर्गा सुंदर महाल मिळाले परंतू ‍आपल्या घरात धान्य नसल्याचे बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाली की मी अनेक व्रत, पूजा केली तरी माझ्या घरात धान्य नाही, यामागील कारण आहे तरी काय?
 
यावर मी तिला म्हटले की- आधी तु आपल्या घरी जा. देव स्त्रियां तेथील येतील तुला बघायला. आधी त्यांच्याकडून षटतिला एकादशीचे पुण्य आणि विधी जाणून घे मग दार उघड. माझे वचन ऐकून ती तेथून निघून गेली. जेव्हा देव स्त्रियां आल्या आणि दार उघडण्याचा आग्रह करु लागल्या तेव्हा ब्राह्मणी म्हणाली- आपण मला बघायला आल्या आहात तर आधी मला षटतिला एकादशीचे माहात्म्य सांगा.
 
त्यापैकी एक देवस्त्रीने तिला षटतिला एकादशी माहात्म्य सांगितले तेव्हा तिने दार उघडले. देवगणांनी तिला बघितले की ती गंधर्वी किंवा आसुरी नसून मानुषी आहे. त्या ब्राह्मणीने सांगितल्याप्रमाणे षटतिला एकादशी व्रत केले आणि त्या प्रभावाने ती सुंदर आणि रुपवती झाली. तिचं घर धन-धान्याने भरले.
 
म्हणून मनुष्याने मूर्खतेचा त्याग करुन षटतिला एकादशी व्रत करावे. लोभ सोडावा आणि या निमित्ताने तिळाचे दान करावे. याने दुर्दैव, दारिद्र्य आणि अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते.