शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

रेवती नक्षत्रात साजरी होणार वसंत पंचमी, या प्रकारे करा पूजा

Vasant Panchami 2024 गुप्त नवरात्रीच्या पाचव्या दिवशी वसंत पंचमी सण साजरा केला जातो. या दिवशी ज्ञान आणि विद्याची देवी सरस्वतीची पूजा केली जाते.
 
मंदिर तसेच शाळेत सरस्वती देवीची आराधना करण्यासाठी विशेष आयोजन केले जातात. या दिवशी देवी प्रकट झाल्याचे मानले जाते म्हणूनच हा शुभ दिवस सरस्वती देवीला समर्पित आहे. या दिवशी सरस्वती देवीची वि‍धीपूर्वक पूजा- अर्चना केली जाते. तसेच सामूहिक विवाह समारंभ देखील आयोजित केले जातात.
 
शुभ मुहूर्त सकाळी 07.01 ते दुपारी 12.35 दरम्यान
या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 07.01 ते दपारी 12.35 दरम्यान राहील. यासह या दिवशी शुभ आणि शुक्ल युग तयार होत आहे. यावेळी रेवती नक्षत्रात वसंत पंचमी साजरी होणार आहे. शुभ योग संध्याकाळी 7.59 पर्यंत राहील आणि त्यानंतर शुक्ल योग सुरू होईल. यासोबतच या दिवशी सकाळी 10.40 पासून रवि योगही तयार होत आहे.
 
या प्रकारे करा पूजा
देवी सरस्वतीची पूजा करण्यासाठी सकाळी स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करून पूजा करण्याचा संकल्प घ्यावा. शुभ मुहूर्तावर देवी सरस्वतीची पूजा करावी. पूजेच्या वेळी पिवळी फुले, पांढरे चंदन, अक्षत, पिवळ्या रंगाची रोळी, पिवळा गुलाब, धूप, दिवा, सुगंध इ. अर्पण करा. सरस्वती पूजनाच्या दिवशी सरस्वती पूजनासह सरस्वती कवच ​​पठण करावे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात रस निर्माण होईल आणि सकारात्मक परिणाम मिळतील.
 
सरस्वती देवीची आरती
जयदेव जयदेव जय अद्वयमूर्ति । सच्चिदानंदेंद्र श्रीसरस्वती ॥धृ॥
स्वगतादिक भेदाचा जेथें मळ नाहीं ।
नानाभारी विवर्जित निजवस्तु पाहीं ।
सर्व श्रुतीचा अन्वय जाला जे ठायीं ॥
तें हें ब्रह्म गुरुरूप जाणा लवलाहीं ॥१॥
ज्याच्या सत्तामात्रें जग सर्वहि विलसे ॥
जैसें रज्जूवरुते सर्पत्व भासे ।
नामरूपात्मक सर्वहि कल्पांतीं नासे ॥
परि हे निश्चळ निर्मळ सद्रुप अविनाश ॥२॥
ज्याच्या प्रकाशयोगें रविशशिचा महिमा ।
मनबुद्धयादिक इंद्रिय वर्तति निजकर्मा ॥
सर्व प्रकाशक अलिप्त कर्म आकर्मां ।
ज्ञानाज्ञानावांचुनि ज्ञानचि नि:सिमा ॥३॥
परिच्छेद त्रय नसती ज्यालागीं ।
ऐशा अनंत स्वरूपा ध्यावी निजयोगी ॥
दु:खाचा संस्पर्श न दिसे त्य आंगीं ।
नीरंजन होउनिया विचरति नि:संगी ॥४॥
-निरंजनस्वामीकृत आरती