सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (13:13 IST)

जया एकादशी तिथी, व्रत मुर्हूत आणि पूजा विधी

माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला जया एकादशी व्रत ठेवण्याची पद्धत आहे. यंदा ही तिथि 23 फेब्रुवारी आहे. पौराणिक माहितीनुसार या दिवशी व्रत-पूजन केल्याने भूत ‍पिशाच योनीची भीति नाहीशी होते. एकादशी महात्म्या स्वयं श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिर यांना सांगितले होते.
 
जया एकादशी व्रत शुभ मुहूर्त-
 
एकादशी तिथिी आरंभ- 22 फेब्रुवारी 2021 वार सोमवार संध्याकाळी 05 वाजून 16 मिनिटापासून
एकादशी तिथी समाप्त- 23 फेब्रुवारी 2021 वार मंगळवार संध्याकाळी 06 वाजून 05 मिनिटापर्यंत
जया एकादशी पारणा शुभ मुहूर्त- 24 फेब्रुवारी सकाळी 06 वाजून 51 मिनिटापासून ते सकाळी 09 वाजून 09 मिनिटापर्यंत
पारणा अवधी- 2 तास 17 मिनिटे
 
जया एकादशी पूजा विधी
 
जया एकादशीला सूर्योदयापूर्वी उठावे.
स्वच्छ हलक्या पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे.
5 पांढरे जानवे केशरच्या रंगात ‍रंगवून घ्यावे आणि 5 स्वच्छ पिवळे फळं मांडावे.
आता पिवळ्या रंगाच्या आसानावर बसून तुळशी माळ घेऊन ॐ नमो भगवते वासुदेवाय मंत्र याच्या तीन माळी जपाव्या.
जप झाल्यावर पाची जानवे आणि पिवळे फळ विष्णू मंदिरात जाऊन अर्पित करावे आणि आपली मनोकामना देवाला सांगावी.
स्वत प्रसाद रुपी एक केळ घरी आणावे आणि कुटुंबासह ग्रहण करावे.
शांती आणि भक्ती भावाने पूजा करावी.