रथसप्तमी
रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते. आरोग्य स्साप्त्मी, अर्क सप्तमी,माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो.
हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते. या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे, पूजन केल्याने समृद्धी प्राप्त होते. या दिवशी तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्याची रांगोळी काढून सात घोडे आणि सारथी अरुण यांसह सूर्याची पूजा करतात.
या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात मकरसंक्रातीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदीकुंकवाचे दैनंदिन समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात.