गुरुविना कोण दाखवील वाट
मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी सद्गुरू आपणास आपोआप भेटतात..! काहींना त्रास होतो. माणसाचे भोग संपत आले की, सद्गुरूंचा पत्ता मिळतो..! काहींना अगोदर मिळतो, कारण त्यांचे मागील जन्माची पुण्याई असते..! काहींना जाणीव पूर्वक मिळतो. तर काहींना अपघाताने काहींना पत्ता मिळतो. पण त्यांचे मन तयार होत नाही..! काही जण येण्यास इच्छुक असतात. पण पाठीमागची काळजी, चिंता, पाप हे येऊ येऊ देत नाही..! काही जण त्या पत्त्यावर येतात. पण त्या मार्गात अडथळे येतात.! काही जण भरकटतात, फसतात. हि त्यांची परीक्षा असते..! कारण त्यांचे भोग हे त्यांना पोहचू देत नाहीत. भोग संपत आले की गुरु भेटतातच.!
आधी करावी सेवा मग मिळतो मेवा. आधी करावी चाकरी मग मिळते सद्गुरूंची सेवेची भाकरी.! आपल्या गुरुंवरील श्रद्धा, विश्वास ठाम ठेवा. कोणत्याही परिस्थिती मध्ये चुकीचा मार्ग अवलंब करू नका. भलत्याच वाटेला जाऊ नका. वेळ लागेल पण आपले गुरू आपले चांगलेच करतील हा विश्वास ठाम ठेवा. आणि शेवटी एक लक्षात ठेवा तुम्ही कोठेही जा काहीही उपाय करा पण या ब्रम्हांडनायकाच्या परवानगी शिवाय झाडाचे पान सुद्धा हालत नाही हे मात्र लक्षात ठेवा. मग पहा आपण काय करायचे ते भलत्या वाटेने जायचे की आपल्या गुरुंच्या वाटेने जायचे. खरे पाहता गुरू शिवाय शिष्य नाही, झोळी खप्परा शिवाय भिक्षा नाही, त्रिशूळ चिमट्या शिवाय शस्त्र नाही, कुबडी रुद्राक्ष माळ शिवाय साधना नाही, कपाळावर भस्म(विभूती) शिवाय संरक्षण नाही.
सर्व इंद्रियांची ताकद पूर्ण एकवटून सद्गुरू मुखातून मिळालेलं ज्ञान आपल्याला पेलता आलं पाहिजे आणि मग त्याच कृतीत रूपांतरही करता आलं पाहिजे। ध्यान या विषयावर आपण नुसतंच ऐकत किंवा वाचत राहिलो तर त्याचा काही उपयोग नाही। जो ते ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवेल, त्यालाच त्याचा उपयोग होईल। ध्यान हे एक तप आहे। एका जागी एका वेळी कोणतंही काम न करता शांत बसून राहणं हे सगळ्यात मोठं तप आहे। एरवी मनुष्य चित्रपटगृहात कित्येक तास काही काम न करता शांत बसू शकेल। परंतू सिनेमा बघणं आणि ध्यान करणं हयात मोठा फरक आहे। कोणी म्हणेल अहो मी तीन तास एका जागी बसून सिनेमा बघतो म्हणजे मी ध्यानच करतो। पण हे ध्यान नव्हे, कारण खऱ्या ध्यानात आपल्या समोर कोणतंही चित्र निर्माण होत नाही किंवा कुठला आवाजही ऐकू येत नाही। म्हणजे काही 'नसणं' हेच तिथे 'असत' आणि त्यालाच ध्यान म्हणतात।सुरुवातीच्या काळात प्रतीकावर आणि त्यानंतरच्या काळात प्रतीकाविना घडू शकणार ध्यान आपल्याला अपेक्षित आहे आणि आवश्यकही आहे।
गुरुंची सेवा करणे, गुरुंनी दिलेली साधना "नित्यनेमाने" करणे, त्यामध्ये खंड पडता कामा नये, तसेच शक्यतो वेळ चुकवू नये, कारण आपण जसजशी साधना नेमाने करू लागतो, "गुरुदेव त्या वेळेला आपली वाट पाहत असतात ही भावना एकदा का मनामध्ये रुजली की साधनेमध्ये सातत्य आपोआप येऊ लागते. आज झोप झाली नाही, आज बरं वाटत नाही म्हणून साधनेची वेळ चुकवू नये. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे श्रेष्ठ गुरुंचे चरण आपल्याला मिळाले ही त्यांची आपल्याप्रती दया भावना आहे हे लक्षात असू द्यावे. बाकी गुरुंची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. भगवंताप्रती आपला भाव कसा दृढ होईल हेच ते पाहत असतात. आपल्या प्रापंचिक समस्या त्यांच्या चरणीं दृढ झाल्यावर आपोआपच मार्गी लागतात. त्यांना सांगायची गरजच लागत नाही, पण त्यांच्या विषयी तेवढी श्रद्धा आणि निष्ठा आपल्या मनात असली पाहिजे. आपल्या बरोबर ते असतातच, फक्त आपली श्रद्धा आणि निष्ठा ते सतत तपासून पाहतात. आपल्या आयुष्यात घडणार्या प्रत्येक प्रसंगी ते आपली परीक्षा पाहत असतात, आपली "निष्ठा" कुठे डळमळत तर नाही ना! त्यामुळे सदैव त्याचे स्मरण करून आयुष्यात घडणार्या प्रसंगांना सामोरे जावे. आपला सर्व भार आपल्या निष्ठेप्रमाणे ते घेतातच. फक्त आपलं आचरण, विचार यांना आपणच सांभाळायचं आहे..एक मात्र नक्की गुरुविना कोण दाखवील वाट.
साभार - सोशल मीडिया