शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (09:26 IST)

दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा ओट्यावर थोडा वेळ का बसतात?

आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या वयस्क किंवा वडीलधाऱ्या लोकांनी कधीतरी सांगितलेलं असेलच की मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर दर्शन करून वापस आल्यावर मंदिराबाहेरील ओट्यावर किंवा पायऱ्यांवर बसायला पाहिजे.
 
परंतु तुम्हाला माहितीय का की या परंपरेमागचं मूळ कारण काय आहे? 
आजकाल काही लोकं दर्शनाला जातात आणि वडीलधाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पायऱ्यांवर बसतात आणि तिथं बसून व्यावसायिक किंवा राजकीय चर्चा सुद्धा करतात. परंतु ही प्राचीन परंपरा एका विशिष्ट उद्देशासाठी बनवली गेली होती. 
 
वास्तविक पाहता आपण सर्वांनी मंदिराच्या ओट्यावर किंवा पायऱ्यांवर बसून एक श्लोक म्हणायला हवा, जो आजकाल बहुतांश लोकं विसरून गेले आहेत. 
 
तुम्ही स्वतः हा श्लोक वाचायला हवा आणि आपल्या येणाऱ्या भावी पिढीला पण सांगायला हवा...
 
श्लोक पुढीलप्रमाणे :-
अनायासेन मरणम्, बिना देन्येन जीवनम् ।
देहांते तव सानिध्यम्, देहि मे परमेश्वरम् ।।
 
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, 
 
अनायासेन_मरणम्
अर्थात, माझा मृत्यू कोणत्याही पिडे विना म्हणजे त्रासदायक अवस्थेत होऊ नये आणि मी कधीही आजारी होऊन, एका जागेवर पडून त्रासदायक अवस्थेत कष्ठ उचलून होऊ नये. माझा मृत्यू अगदी चालत-फिरत असतानाच्या अवस्थेत व्हावा. 

बिनादेन्येनजीवनम्
अर्थात, माझं जीवन हे सक्तीचं जीवन नसावं, म्हणजे मला कधी कोणाच्या आश्रयाची आवश्यकता पडू नये. माझं जीवन लाचार बनू नये आणि ईश्वराच्या कृपेने माझं आयुष्य विना भिक्षेचं निघून जावं. 
 
देहांतेतवसानिध्यम्
अर्थात, मला जेव्हा पण मृत्यू येवो तेव्हा तो मी परमेश्वराच्या समोर असतानाच येवो. जसं पितामह भीष्म यांच्या मृत्यूवेळी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले होते आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतरच भीष्मांचा मृत्यू झाला होता. 
 
देहिमेपरमेश्वरम् अर्थात हे परमेश्वरा मला असं वरदान दे. 
 
देव दर्शनानंतर अशीच प्रार्थना करा. आणि ही प्रार्थना आहे, याचना नाही हे लक्षात ठेवा. याचना ही सांसारिक गोष्टींसाठी असते, जसं की धन, घर, व्यापार, नोकरी, मुलगा, मुलगी, सांसारिक सुख किंवा अन्य गोष्टी. ही याचना म्हणजेच भीक आहे. प्रार्थनेचा विशेष अर्थ असतो अर्थात विशिष्ट, श्रेष्ठ. प्रार्थना म्हणजे निवेदन. त्यामुळे ईश्वराकडे प्रार्थना करा.