सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By
Last Updated : गुरूवार, 20 एप्रिल 2023 (15:42 IST)

Akshay Tritiya 2023 निदान या प्रसंगीतरी याला मडकं म्हणू नका

matka pot
अक्षय्य तृतीयेची पूजा करायची म्हणून खरेदीला गेलो होतो. माझे साहित्यिक मित्र ही खरेदीला आले होते.
 ते माझ्या कुंभार मित्राला म्हणाले "मडकं दे". 
तो पटकन त्यांच्याकडे बघून म्हणाला "या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका"
खरेतर मलाही माहित नव्हतं त्याला नक्की काय म्हणतात. उत्सुकते पोटी मी त्याला विचारले, "मग काय 
म्हणतात याला?". 
 
"स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचे त्याला केळी व स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचे त्याला करा म्हणतात". 
माझ्या मराठी शब्दकोषात दोन शब्द वाढले. 
मराठीत मातीच्या भांड्याला उपयुक्ततेनुसार व प्रसंगानुसार वेगवेगळ्या नांवांनी संबोधले जाते अशी माहिती 
झाली.
 
पाण्याचा ...माठ
अंत्यसंस्काराला...मडकं
नवरात्रात...घट
वाजविण्यासाठी...घटम्
संक्रांतीला...सुगडं
दहिहंडीला...हंडी
दही लावायला...गाडगं
लक्ष्मीपूजनाचे...बोळकं
लग्न विधीत...अविघ्न कलश
आणि
अक्षय्य तृतीयेला...केळी व करा
 
खरंच आपली मराठी भाषा समृद्ध व श्रीमंत आहेच. मला मंगल प्रसंगी हातात धरतात त्याला करा म्हणतात हे माहिती होते पण अक्षय तृतीयेला केळी व करा म्हणतात माहिती नव्हते, तुम्हाला माहीत होते का ?
 
-सोशल मीडिया