गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Updated : शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (09:52 IST)

Harry Potter's 'Hagrid' dies अभिनेते रॉबी कोल्ट्रेन यांचं निधन

roby herry potter
हॉलिवूडच्या हॅरी पॉटर मालिकेची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. दरम्यान, या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या चित्रपटात हैगरिड भूमिका करणारा अभिनेता रॉबी कोलट्रेन यांचे निधन झाले आहे. या अभिनेत्याने वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. स्कॉटलंडमधील रुग्णालयात शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोणतेही कारण समोर आले नाही.
   
रॉबी कोलट्रेन क्रॅकर () नावाच्या 1990 च्या मालिकेतून प्रकाशझोतात आले. या मालिकेत त्याने गुप्तहेराची भूमिका साकारली होती. यासाठी त्याला ब्रिटीशअकादमी टेलिव्हिजन अवॉर्ड्स (BAFT) मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता.
   
हॅरी पॉटरबद्दल सांगायचे तर रॉबीने या मालिकेत हॅग्रीडची भूमिका साकारली होती. या भूमिकेनंतर त्याची फॅन फॉलोइंग जगभरात वाढली होती. अशा परिस्थितीत त्यांच्या निधनामुळे जगभरातील त्यांचे चाहते दु:खी झाले आहेत.
   
हॅरी पॉटर लिहिणारे प्रसिद्ध लेखक जेके रोलिंग यांनीही रॉबीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Edited by : Smita Joshi