बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (17:28 IST)

Cold and Flu संसर्ग कसा टाळायचा?

cold weather
सर्दी, ताप, खोकला किंवा फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी हे उपाय करा-
 
- दिवसभर खूप पाणी प्या, पण लक्षात ठेवा की पाणी उकळलेले असावे.
 
- लसूण आणि मिरची खा. लसूण बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतं तर मिरचीमध्ये कॅप्सेसिन असतं, जे नाक आणि सायनस कंजेक्शन दूर करतं.
 
- व्हिटॅमिन-सी युक्त फळे आणि भाज्यांचे सेवन करा. आहारात मशरूम, लिंबू आणि मध यांचा समावेश करा.
 
- झिंकयुक्त पदार्थ घ्या. उदाहरणार्थ, लाल मांस, अंडी, दही, संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा.
 
- जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही चिकन सूप घेऊ शकता. त्यात सिस्टीन असते, जे कफ विरघण्यास मदत करते.
 
- रोज रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे हळदीचे दूध प्या.
 
- आल्याचा छोटा तुकडा थोडे मीठ टाकून सेवन करा.
 
- जास्त संसर्ग झाल्यास वाफ घेणे सुरू करा. जेव्हा जेव्हा तुमचे नाक बंद होते तेव्हा वाफ घ्या.
 
- दिवसभर कोमट पाणी प्या.
 
- घसा खवखवणे किंवा वेदना होत असल्यास गुळण्या करा.