गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (14:32 IST)

Kitchen Hacks: जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Clean Burn Pot : अनेकवेळा अन्न गॅसवर शिजवायला ठेवल्यावर गॅसवरून काढायला  विसरतो, आणि अन्न करपते आणि त्यामुळे भांडी देखील जळतात. या स्थितीत करपलेले अन्न स्वच्छ करण्यापेक्षा जळालेले भांडी साफ करणे कठीण जाते. कारण जेव्हा अन्न जळते ते भांड्यात चिकटते तेव्हा ते साफ करणे खूप कठीण होते. हट्टी जळलेले डाग खूप घासूनही जात नाहीत. तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर काळजी करू नका. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही काही मिनिटांत जळलेल्या भांड्यांचे हट्टी डाग दूर करू शकता. चला जाणून घेऊया 
 
1 जळलेली भांडी कांद्याच्या सालीने स्वच्छ करा-
जळलेल्या भांड्यांवरचे डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही कांद्याची साल वापरू शकता. ते वापरण्यासाठी प्रथम जळलेली भांडी घ्या. त्यात पाणी आणि कांद्याची साल घाला आणि सुमारे 20 मिनिटे उकळवा. कांद्याची साल चांगली उकळून पेस्टसारखी झाली की गॅस बंद करा. त्यानंतर ते स्क्रबरने स्वच्छ करा. यामुळे तुमची भांडी चमकतील. 
 
2 बेकिंग सोडा सह जळलेली भांडी चकचकीत करा-
जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरा. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घ्या. यानंतर, डिशवॉशिंग ब्रशच्या मदतीने जळलेली भांडी स्वच्छ करा.  
 
यानंतर कांद्याचे दोन तुकडे घ्या. आता डागावर घासून घ्या. असे केल्याने खरखरीत जळलेले डाग निघू लागतात. यानंतर, या भांड्यात पाणी भरा आणि सुमारे 20 मिनिटे सोडा. त्यानंतर स्क्रबरच्या मदतीने पुन्हा स्वच्छ करा. यामुळे जळलेले भांडे चमकतील.