गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By

कुंभ राशी भविष्य 2021

हे नवीन वर्ष आपल्यासाठी काय घेऊन आले आहे जाणून घेऊ या 
 
जाणून घेऊ या की येणारे वर्ष 2021 कुंभ राशी साठी रोमांस,धन, करिअर आणि आरोग्यासाठी कसे असेल कुंभ राशी आपल्या हसऱ्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. या राशीचे लोक सर्जनशील आणि सकारात्मक विचारांचे असतात. निराशा ह्यांच्या पासून लांबच असते. हे वर्ष जरी खूप चांगले तर नाही पण वाईट देखील  नाही.  अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. पैसे येतील,आनंद मधून -मधून देखील दार ठोठावेल. विरोधकांपासून सावध राहा. आपण खूपच प्रेमळ आहात सर्वांची मदत करण्यासाठी तयार असता. हीच सवय आपल्याला या वर्षी यश मिळवून देईल.  या राशीच्या लोकांची मदत करण्याची सवय  गरजूंसाठी आधार देईल. या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्तच यश मिळवाल. पण ग्रहमान सांगत आहे की अडथळे देखील येतील.अपघाता पासून वाचावे. नात्याला सांभाळा आणि संवेदनशील राहा. कामाला घेऊन गांभीर्यता ठेवा. कामासाठी आपल्या आनंदाला त्यागू नका.सर्वाना आनंदी ठेवण्याची इच्छा बाळगू नका. काही न काही काम राहील त्याचा परिणाम आपल्यावर होऊ देऊ नका.
 
हे वर्ष आपली लोकप्रियता वाढवेल. आपण हसण्याची आणि आनंदाने फुलण्याची संधी घेऊन घ्याल. नोकरदार आहात तर अधिकारीवर्ग आपल्या कामावर समाधानी राहतील पण समोरून कौतुक ऐकणे आपल्या नशिबात नाही. आपल्या मागून आपल्या कौशल्यतेचे कौतुक सर्व करतील. विचारसरणी मध्ये मतभेद असल्यामुळे आपण सर्वांचे प्रिय असाल. या वर्षी आपण एखादी मोठी खरेदी करू शकाल. जे आपले नशीब बदलेल. कलेत रस वाढेल. यंदाच्या परिस्थितीला हाताळण्यासाठी आपली तीक्ष्ण बुद्धिमत्ता कामी येईल. कुंभ राशीच्या लोकांना परदेशगमनाची इच्छा असल्यास त्यांची इच्छा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये पूर्ण होईल. आर्थिक स्थिती मागील वर्षापेक्षा चांगली असेल. पण आपल्याला अपेक्षा प्रमाणे मिळणार नाही. आपल्याला त्यासाठी वाट बघावी लागेल. एकंदरीत हा काळ शांततेने आणि सहजतेने जाईल. कुठूनतरी एकाएकी धनलाभ होईल पण आपले खर्च देखील आहेच. पैशाचे व्यवस्थापन आपल्याला जमत नाही. आपण त्यासाठी प्रयत्न करू नका. जसे चालत आहे तसे चालू द्या. हे वर्ष आध्यात्मिक दृष्टीने खूपच चांगले जाणार आहे. धर्माच्या प्रति आपली खोल रुची वाढेल.    
  
रोमांस साठी कसे असणार हे वर्ष 2021 :
आपण स्वभावाने भावुक आणि रोमँटिक आहात. आपल्या प्रेमाला कसं व्यक्त करावयाचे असते हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे. आपण आपल्या प्रेमाला मिळविण्यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकता. या वर्षी आपल्याला इच्छित जोडीदार मिळेल आणि दोघांचे चांगले जमेल. आपले प्रेम प्रकरण सुरू असतील तर त्या मध्ये गोपनीयता ठेवा कारण आपले विरोधी सक्रिय होतील. आपण आपल्या संशयी आणि हुकूमशाही स्वभावा वर आळा घाला. आपल्या रोमँटिक आयुष्यात बरेच रंगीत क्षण येतील. त्याच्या सह वेळ घालवाल. जोडीदारासाठी आपण खूप समर्पित असाल. मन मोठं ठेवा आपल्या जोडीदाराचे देखील आपल्यावर प्रेम आहे त्याच्या वर विश्वास ठेवा. या वर्षी जोडीदाराकडून भेट वस्तू मिळतील. विवाहित असल्यास जोडीदारासाठी  जबाबदाऱ्यांमधून देखील वेळ काढाल. आपल्या जोडीदाराशी कटाक्ष बोलणे टाळा. आपले प्रेमच त्यांची शक्ती आहे. प्रेम व्यक्त करण्याची कोणतीही संधी गमावू नका. हे वर्ष आपल्यासाठी काही आनंद देणारे आहे.

आर्थिक व्यवहारासाठी कसे असणार हे वर्ष 2021 :
या वर्षात जसे पैसे येतील तसे जातील. बचत होणार नाही. आपण पैशाचे योग्य व्यवस्थापन करू शकत नाही. म्हणून यंदाच्या वर्षी तेवढेच कमवा जेवढे कर्ज फेडण्यासाठी आवश्यक असेल. ग्रहमान सांगत आहे की नोकरीत पैसे वाढतील पण मनाप्रमाणे आणि कष्टानुसार नाही. म्हणून या वर्षी संयम बाळगा. पुढील वर्ष 2022 पैश्यासाठी उत्कृष्ट असेल पण यंदाचे वर्ष 2021 चे ग्रहमान फिकट आहे. आपण निराश होणाऱ्यां पैकी नाही कारण आपल्यासाठी धनापेक्षा मनाचे आनंद अधिक मोलाचे आहे. शेअर बाजारात आपले पैसे वाढतील. या वर्षी आपण कर्जातून मुक्ती मिळवाल. पुढचे 2022 चे वर्ष आपल्यासाठी आरामशील जाईल .खरी संपत्ती तर आरोग्य आहे जर आरोग्य चांगले असेल तर वर्षाचे अखेरीस आपल्याला पैश्याच्या बाबतीत संमिश्र आनंद देईल.
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 :
नोकरीत आपण चांगल्या कार्यक्षमतेसह चांगले प्रदर्शन करण्यात सक्षम असाल. वरिष्ठ अधिकारी वर्ग आपल्यावर प्रसन्न होतील. आपली प्रतिमा मजबूत होईल. जे लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांना या वर्षी वाट बघावी लागेल. नोकरदार वर्गासाठी वर्षाचा मध्यकाळ तणावाचा असेल. आपल्यावर लक्ष पूर्ण करण्यासाठी दबाव राहणार आहे. वर्षाच्या अखेरी आपल्यालाआराम मिळेल. कुंभ राशीच्या व्यवसायी लोकांना वर्ष  2021 च्या पहिल्या महिन्यापासूनच चांगले ऑर्डर मिळू लागतील.व्यवसाय वाढेल. व्यवसायाचे वेग वाढतील, पण एप्रिल ते जुलै चे महिने कमकुवत राहतील म्हणून या काळात काळजी घ्या.    
 
आरोग्यासाठी कसे असणार वर्ष 2021 :
वर्ष 2021 ची सुरुवात आपल्यासाठी  मध्यम फळ देणारी असेल, पण संपूर्ण वर्ष ग्रहमान उच्च आहे. आपले आरोग्य चांगले राहतील. आपल्याला जुन्या आजारांपासून देखील मुक्ती मिळेल. या वर्षी आपण स्वतःला योगा आणि प्राणायाम च्या साहाय्याने तंदुरुस्त ठेवा. किरकोळ जखमा होण्याचे चिन्हे दिसत आहे. एकंदरीत हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगले जाणार आहे. आपण आपल्या खाण्यापिण्याकडे जातीने लक्ष द्याल. ताण आणि थकव्याच्या मध्ये देखील आपल्या आनंदाची काळजी देखील घ्याल. आपण मनाने खूप सकारात्मक आहात म्हणून कोणतेही आजार आपल्याकडे जास्तकाळ राहत नाही. या राशीचे लोक प्रामुख्याने सर्दी पडसं,डोकेदुखी आणि घश्याच्या तक्रारीने ग्रस्त असतात पण या वर्षी आपण निरोगी राहाल. बऱ्याच तक्रारींवर विजय मिळवणे हीच आपली शक्ती आहे.