सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (18:48 IST)

साप्ताहिक राशीफल 17 ते 23 जानेवारी 2021

मेष : सप्ताहाचा उत्तरार्ध यशदायकसप्ताहाचा उत्तरार्ध यशदायक आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना हा सप्ताह विशेष चांगला आहे. काहींच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. विद्यार्थ्यांना विशेष यश मिळणार आहे. शासकीय कामाच्या दृष्टीने 19 पासूनचा कालखंड चांगला आहे. सप्ताहाच्या उत्तरार्धात थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांची मदत लाभेल. मुला-मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. महत्त्वाचे निर्णय सप्ताहाच्या उत्तरार्धात घ्यावेत. आर्थिकबाबतीत ग्रहमान सामान्य आहे. फार मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत. आर्थिकबाबतीत जपून पावले टाकावीत. नुकसानीची शक्यता अधिक आहे. फार मोठय़ा यशाची अपेक्षा करण्यासारखा हा सप्ताह नाही. 
 
वृषभ : संमिश्र स्थितीआरोग्य चांगले राहणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार आहे. महत्त्वाची शासकीय कामे19 पूर्वी उरकून घ्यावीत. तसेच प्रॉपर्टीचे व्यवहार करायचे असतील तर तेही उरकून घ्यावेत. आर्थिकबाबतीत संमिश्र स्थिती राहील. साडी सेंटर, ज्वेलर्स यांना विशेष यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. मात्र, परिस्थिती व ग्रहमान हे संमिश्र स्वरूपाचे आहे. व्यवसायात धाडस करण्यासारखी स्थिती नाही. संततीसौख्याच्या संदर्भात संमिश्र स्थिती राहील. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. वैवाहिक जीवनात परिस्थिती सुधारणार आहे. कामाचा ताण पडेल, जबाबदारी वाढणार आहे. आर्थिक लाभाच्या दृष्टीने सप्ताहाचा उत्तरार्ध चांगला आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. 
 
मिथुन : सुयश लाभेलमिथुन व्यक्तींना ग्रहमान चांगले आहे, अनुकूल आहे. शासकीय कामासाठी संपूर्ण सप्ताह चांगला आहे. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रॉपर्टीसाठी संपूर्ण सप्ताह चांगला आहे. तसेच गुंतवणुकीसाठी चांगला आहे. तुमच्या राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. बदली हवी असेल तर अवश्य प्रयत्न करावेत. बदलीची कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना बढतीची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. काहींची एखाद्या मंडळावर नेमणूक होण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्यता आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
 
कर्क : प्रतिष्ठा लाभेल. कर्क व्यक्तींना ग्रहमान चांगले आहे. शासकीय कामासाठी संपूर्ण सप्ताह चांगला आहे. प्रॉपर्टी व गुंतवणुकीला सप्ताह चांगला आहे. तुमच्या राहत्या जागेचे प्रश्न सुटतील. नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग येतील. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. काहींना बढतीची शक्यता आहे. काहींची एखाद्या मंडळावर नेमणूक होईल. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. टुरिस्ट कंपनी, प्रॉपर्टी, बिल्डर्स, डेव्हलपर्स व कॉण्ट्रॅक्टर्स, साडी सेंटर, केटरिंग, ज्वेलर्स यांना विशेष फायदा मिळणार आहे. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायात बाजारापेठेचा अभ्यास करून धाडस करावयास हरकत नाही. शेअर्समध्येही यश मिळेल. 
 
सिंह : सप्ताहाचा उत्तरार्ध यशदायकसप्ताहाच्या उत्तरार्धात आरोग्याच्या बाबतीत अनुकूल स्थिती राहील. सप्ताहाच्या पूर्वार्धात आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शासकीय कामासाठी सप्ताहाचा उत्तरार्ध चांगला आहे. सप्ताहाच्या उत्तरार्धात थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात थोड्याफार अडचणी जाणवणार आहेत. प्रॉपर्टीची कामे विलंबाने होणार आहे. वैवाहिक जीवनात सामान्य स्थिती राहील. नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. मुला-मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. अपेक्षित पत्रव्यवहार होईल. आर्थिकबाबतीत समाधानकारक स्थिती राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल. बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. काहींची नको त्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. 
 
कन्या : दैनंदिन कामात यशया सप्ताहात आपणाला चंद्राची भ्रमणे अनुकूल ठरणार आहेत. उत्साह वाढेल, उमेद वाढेल. मन आशावादी राहील. तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार कराल. लहानसहान व दैनंदिन कामे मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. शासकीय कामाच्या दृष्टीने सप्ताहाचा पूर्वार्ध चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायात थोड्याफार अडचणी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. काहीजण दानधर्म करतील. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. मनोबल व आत्मविश्वाणस यांच्या जोरावर अडचणीवर मात कराल. मित्रांचे व अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. संततीसौख्य सामान्य राहणार आहे. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने सप्ताहाचा पूर्वार्ध चांगला आहे. 
 
तूळ : सुसंधी लाभेलआपल्या कार्यक्षेत्रात आपणाला सुसंधी लाभणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळणार आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शासकीय कामे सप्ताहाच्या उत्तरार्धात करावीत. महत्त्वाचे करारमदार करण्यास सप्ताहाचा उत्तरार्ध चांगला आहे. आर्थिकबाबतीत सप्ताह संमिश्र आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. सप्ताहाचा उत्तरार्ध विशेष यशदायक जाणार आहे. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. नवी दिशा सापडेल, नवा रस्ता दिसेल. काहींच्या बौद्धिक व वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. व्यवसायात सुधारणा होईल. नवीन करारमदार करण्यास सप्ताहाचा उत्तरार्ध चांगला आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. सप्ताहाचा उत्तरार्ध हा अनेक दृष्टीने आपल्याला लाभदायक ठरणार आहे.
 
वृश्चिक : व्यवसायात समाधानकारक स्थितीआरोग्याकडे दुर्लक्ष नको. कामाचा ताण पडणार आहे, दगदग वाढणार आहे. कौटुंबिक जीवनात, नोकरी, व्यवसायात व सार्वजनिक जीवनात जबाबदारी वाढणार आहे. शासकीय कामाच्या दृष्टीने संपूर्ण सप्ताह चांगला आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. संतती सौख्याच्या दृष्टीने सप्ताह चांगला आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. मुला-मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय सप्ताहाच्या पूर्वार्धात घ्यावेत. मित्रांच्या सहकार्यावर व आश्वाशसनावर अवलंबून राहू नका. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. विरोधकावर मात कराल. प्रॉपर्टीचे व्यवहार विलंबाने होणार आहेत.  
 
धनू : भाग्यकारक घटना घडतीलसाडेसातीची फार धास्ती करण्याचे कारण नाही. हा सप्ताह धनू व्यक्तींना यशदायक आहे. विशेषत: प्रॉपर्टी व गुंतवणुकीला सप्ताह चांगला आहे. तुमच्या राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. बिल्डर्स, डेव्हलपर्स व कॉण्ट्रॅक्टर्स यांना विशेष यश मिळेल. प्रवासाचे व तीर्थयात्रेचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. शासकीय कामासाठी संपूर्ण सप्ताह चांगला आहे. सप्ताहाच्या उत्तरार्धात थोरामोठय़ांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. प्रवासाचे व तीर्थयात्रेचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. सप्ताहाच्या उत्तरार्धात नवीन करारमदार करण्यास ग्रहमान अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. ज्यांना बदली हवी आहे त्यांनी प्रय▪करायला हरकत नाही. बदली आवश्यक ठिकाणी मिळेल. 
 
मकर : उत्साह वाढेलमानसिक स्थिती चांगली राहील. शासकीय कामाच्या दृष्टीने संपूर्ण सप्ताह चांगला आहे. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. नोकरीतील व्यक्तींनाही सप्ताह चांगला आहे. ज्यांना बदली हवी आहे त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. नोकरीत बढतीची शक्यता आहे. मुलामुलींच्या संदर्भात प्रतिकूलता आहे. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावे लागतील. आरोग्य चांगले राहील, परंतु कामाचा ताण जाणवेल. प्रॉपर्टीची कामे उरकून टाकावीत. तुमच्या राहत्या जागेचे, व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. बिल्डर्स, डेव्हलपर्स व कॉण्ट्रॅक्टर्स यांना सप्ताह चांगला आहे. थोरामोठय़ांचे विशेष सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग येतील प्रवास सुखकर होतील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 
 
कुंभ : व्यवसायात आर्थिक लाभआर्थिक लाभाच्या दृष्टीने कुंभ व्यक्तींना ग्रहमान चांगले आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करावयास हरकत नाही. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष फायदा होईल. बिल्डर्स, डेव्हलपर्स व कॉण्ट्रॅक्टर्स यांना सप्ताह चांगला आहे. शासकीय कामासाठी संपूर्ण सप्ताह चांगला आहे. वैवाहिक जीवनात थोडे स्वास्थ्य लाभेल. कामाचा ताण पडणार आहे, जबाबदारी वाढणार आहे. प्रॉपर्टीची कामे विलंबाने होणार आहेत. आरोग्य चांगले राहील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल. विद्यार्थ्यांना ग्रहमान अनुकूल आहे. नवीन करारमदार करण्यास ग्रहमान अनुकूल आहे. शासकीय कामाशी संबंधित व्यक्तींना विशेष यश लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह विलंबाने ठरणार आहेत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. 
 
मीन : सप्ताहाचा उत्तरार्ध यशदायकआर्थिक लाभाच्या दृष्टीने सप्ताहाचा उत्तरार्ध यशदायक आहे. व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. शासकीय कामात यश लाभेल. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना बढतीची शक्यता आहे. प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला सप्ताह चांगला आहे. महत्त्वाची प्रॉपर्टीची कामे उरकून घ्यावीत. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्यता आहे. शत्रुपिडा नाही. विरोधकावर मात कराल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश लाभेल. मनोबल व आत्मविश्वाभस वाढणार आहे. नवीन करारमदार करण्यास सप्ताह चांगला आहे.