गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (19:23 IST)

साप्ताहिक राशीफल 4 ते 10 एप्रिल 2021

मेष राशी
या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी फारच चढ उताराची राहणार आहे. 5 तारखेच्या संध्याकाळपासून 7 पर्यंत तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून आर्थिक व्यवहार सावधगिरीने करा. त्याशिवाय तुम्हाला शारीरिक पीडा आणि गंभीर आजार होण्याची शक्यता आहे म्हणून आरोग्याची काळजी घ्या. मशीन किंवा वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा, नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या दुसर्‍या चरणात धन प्राप्तीचे प्रबळ योग बनत आहे. व्यावसायिक विस्ताराची योजना आखू शकता. तुमच्या प्रगतीमुळे बर्‍याच लोकांना ईर्ष्या होऊ शकते. स्थायी मालमत्तेशी निगडित अडकलेले कार्यांना चाळणा मिळेल. तुमच्या वाणी व व्यवहारामुळे तुमच्या परिचित लोकांच्या संख्येत वाढ होईल. या वेळेस विपरीत लिंगी जातक तुमच्या व्यक्तित्वाने प्रभावित होऊन तुमच्याकडे आकर्षित होतील.  
 
वृषभ राशी
हा आठवडा तुमच्यासाठी फारच सुख, शांती आणि प्रगतिदायक ठरणार आहे. या आठवड्यात तुमच्या पेंडिंग पडलेले कार्य तीव्र गतीने पुढे सरकतील. तुम्ही कार्याची प्रगती पाहून निश्चित व्हाल. तुमचा समाजात सन्मान वाढेल. पण तुमच्या राशीवर सध्या शनीचा ढैय्या असल्या मुळे अपघात होण्याची शक्यता आहे, म्हणून थोडी सावधगिरी बाळगा. तुम्ही घाई गडबडीत तुमचे कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, ज्याने तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून सावध राहा. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा जुने आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. नोकरी करणार्‍या जातकांसाठी हा आठवडा फार अनुकूल असून पदोन्नती तसेच पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कार्यालयात तुमचा प्रभाव वाढेल. कंपनीकडून तुम्हाला बरीच सुविधा मिळण्याची शक्यता आहे.  
 
मिथुन राशी
या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 6 आणि 7 तारीख तुमच्यासाठी फारच उत्तम ठरणार आहे. नोकरी करणार्‍या लोकांसाठी हा आठवडा मध्यम राहणार आहे, जेव्हा कीव्यवसायाशी निगडित लोकांसाठी हा आठवडा फारच प्रगतीचा आहे. या आठवड्यात तुम्हाला नवीन स्थळ येण्याची शक्यता आहे. लग्नाची गोष्ट पुढे जाऊ शकते. या आठवड्यात तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवाल. व्यावसायिक व्यस्ततेमधून वेळ काढून परिवारासोबत एखाद्या सुंदर स्थळाला फिरायला जाऊ शकता ज्याने तुमच्या संबंधात अधिक घनिष्ठता येईल. सरकारी विभागांशी निगडित कार्य लवकरच संपुष्टात येतील. जर तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर ती देखील या आठवड्यात संपुष्टात येईल. विद्यार्थी वर्ग आणि नोकरी करणार्‍या लोकांसाठी हा आठवडा फारच उत्साहाचा जाणार आहे.  
 
कर्क राशी
या वेळेस तुमचे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण होतील. कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी असेल किंवा कुणाकडून दुःखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. भाऊ बहिणींशी तुमचे संबंध आधीपेक्षा जास्त सुमधुर असतील. जर संबंधांमध्ये आधीपासून मतभेद सुरू असतील तर या आठवड्यात ते सर्व संपुष्टात येतील. तुम्हाला सामाजिक समारंभात जाण्याचे योग येतील. त्यामुळे तुमची ओळख अधिक वाढेल. या आठवड्यात कमी किंवा जास्त तुमचा प्रवासाचा योग असून धार्मिक यात्राही करू शकता. तुम्ही घरात सुख सुविधांच्या वस्तूंची खरेदी कराल. यामुळे तुमचा कुटुंब खूश होईल त्याचे तुम्हाला समाधान मिळेल. तुम्ही नवीन वाहन खरीदी करू शकता. या आठवड्यात तुमचे बँक बॅलेस वाढणार आहे. नवीन जागा, इंडस्ट्रियल पार्क, रियल एस्टेट, संयंत्रासाठी शेड किंवा नवीन दुकानासाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता.  
 
सिंह राशी
आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला तुमच्या वाणी आणि व्यवहार दोघांवर विशेष लक्ष्य ठेवा. नाहीतर नकळत तुमच्यामुळे कोणी दुखावले जाईल. तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनात संतुलन कायम ठेवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. संपत्ती किंवा पारिवारिक संपतीचे प्रकरण न्यायालयात पोहचण्याची शक्यता आहे. मागील आठवड्याप्रमाणे तुम्ही तुमचाव्यवसायात प्रगती कराल. म्हणून गणेशजींचा तुम्हाला सल्ला आहे की तुम्हाला बिजनस विस्तार किंवा नवीन उद्यम सुरू करण्यासाठी गुंतवणूक केले तर उत्तम राहील. बाजारात सुरू असलेल्या स्पर्धेमुळे तुम्ही पूर्ण आठवडा विचारात राहाल. तुम्ही तुमच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि कार्याच्या प्रती समर्पण भाव ठेवल्यामुळे यश मिळवाल. जमीन, घर, वाहन इत्यादीची खरेदी करू शकता.  
 
कन्या राशी
या आठवड्याच्या सुरुवातीत तुमची प्रत्येक कार्यात एकाग्रता आणि जागरूकता वाढेल. तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या आधारावर पुढे जाल आणि प्रगती कराल. तुमच्या उजव्या डोळ्या किंवा कानाचा त्रास होऊ शकतो. या आठवड्यात तुम्हाला शोक संदेश मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमचे विरोधी सक्रिय राहणार असून प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला अपयशी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण कार्याच्या प्रती तुमचे समर्पण भाव तुम्हाला यशस्वी करेल. उच्च अधिकार्‍यांसोबत तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही तुमची जुनी मालमत्ता विकण्याचा विचार करू शकता. व्यवसायामध्ये भागीदारावर अंधविश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला विशेष लक्ष्य ठेवावे लागणार आहे. ज्या लोकांना परदेशात जायचे आहे त्यांना नक्कीच या आठवड्यात यश मिळेल.  
 
तूळ राशी
या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही आर्थिक बाबतीत फार सशक्त व्हाल आणि घरात सुख सुविधांच्या वस्तू आणण्यावर जोर द्याल. 6 आणि 7 तारखेच्या दरम्यान तुम्हाला वित्तीय घेवाण देवाण संबंधांत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कुणावर ही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. संपूर्ण आठवडा धन मिळाल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. या वेळेस तुमच्या हातात जेवढे ही काम असतील ते पूर्णहोण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यास यशस्वी ठराल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळवाल. लोन घेतल्यास ते पास होईल किंवा उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही भविष्यासाठी गुंतवणूक करू शकता. उद्योग असलेल्या जातकांना चांगला फायदा मिळणार आहे. या वेळेस विरोधकांची एकही डाव यशस्वी होणार नाही.  
 
वृश्चिक राशी
या आठवड्याचा जास्त वेळ तुमचा तणावात जाईल. या वेळेस तुम्हाला आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे फायदा मिळू शकतो किंवा जर कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे, खास करून ते धन जे मिळण्याची उमेद तुम्ही पूर्णपणे सोडली असेल. या काळात लांबणीवर गेलेले बरेच काम पूर्ण होतील आणि काही बाबींचे समाधान निघू शकतात. तुम्ही तुमच्या विरोधींमुळे जमीन, घर किंवा स्थायी मालमत्तेच्या प्रकरणात एखाद्या न्यायालयीन खटल्यात अडकू शकता. त्यासाठी खर्चाचा बंदोबस्त आधीपासूनच करून ठेवायला पाहिजे. व्यक्तिगत आणि व्यावसायिक उद्देश्यासाठी नवीन वाहन खरेदीचे योग तयार होत आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत आपला वेळ घालवाल. तुम्ही एक दुसर्‍यांना महागडे गिफ्ट भेट म्हणून द्याल.  
 
धनू राशी
या आठवड्यात तुमच्या उत्पन्नाचेबरेच स्रोत राहणार आहे, पण अनायस होणार्‍या खर्चांची शक्यता आपण नाकारू शकत नाही. या आठवड्यात तुमचा समाजात मान सन्मान वाढेल. कौटुंबात देखील तुम्हाला महत्त्व मिळेल. सरकारी अधिकारी आणि उच्चाधिकार्यां सोबत होणारी भेट तुम्हाला येणार्‍या भविष्यात चांगली फलदायी ठरणार आहे. प्रोफेशनल क्षेत्रात तुमचे संबंध उत्तम राहणार आहे. 4 आणि 5 तारीखे दरम्यान शेयर बाजार, मिशन आणि ब्रोकर सारख्या कार्यांमध्ये तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. आठवड्यात कुठल्याही प्रकारचा दु:साहस करू नका. जे लोक जोडीदारीच्याशोधात आहे त्यांना या आठवड्यात नक्कीच यश मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जमीन, घर आणि स्थायी मालमत्तेत समजदारीने केलेले गुंतवणूक चांगला लाभ देणारे ठरणार आहे.  
 
मकर राशी 
या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी फारच सुख शांती देणारी असणार आहे. व्यक्तिगत आणि व्यावसायिक गरजेना पूर्ण करण्यासाठी तुम्ही नवीन वस्तूची खरेदी करण्याचे मन बनवाल. पण तुम्ही त्याचे आनंद घेण्यास चुकाल. व्यवसायात तुम्हाला सरकारी कारणांमुळे काही अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. तुम्ही मानसिक रूपेण अस्वस्थ व्हाल. काही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना तुमचे तुमच्या भागीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. भौतिक सुख सुविधेत वाढ होईल, पण तुम्ही मानसिक व्याकुलतेमुळे त्याचा आनंद घेण्यास मुकणार आहात. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल आहे. तुम्हाला या आठवड्यात लक्ष्य प्राप्तीसाठी कडक मेहनत घ्यावी लागणार आहे. लग्नासाठी उत्सुक जातकांचा साखरपुडा होण्याची शक्यता आहे. घटस्फोटातील प्रकरणाचे निर्णय तुमच्याकडून लागण्याची शक्यता आहे.  
 
कुंभ राशी  
या आठवड्याची सुरुवातीत तुम्ही तुमच्या कामांमध्ये व्यस्त राहाल आणि जास्त धावपळ झाल्याने तुम्हाला थकवा जाणवेल. 5 आणि 6 तारखे दरम्यान आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या विरोधींमुळे जमीन, घर किंवा स्थायी मालमत्तेच्या प्रकरणात एखाद्या न्यायालयीन खटल्यात अडकू शकता. त्यासाठी खर्चाचा बंदोबस्त आधीपासूनच करून ठेवायला पाहिजे. व्यक्तिगत आणि व्यावसायिक उद्देश्यासाठी नवीन वाहन खरेदीचे योग तयार होत आहे. घरात वस्त्रदागिने, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, सुख सुविधा इत्यादी साधनांची खरेदी करू शकता. तुम्ही या आठवड्यात कुटुंबासोबत एखाद्या रमणीय स्थळावर फिरायला जाऊ शकता. गुप्त धन किंवा पारिवारिक संपत्तीशी निगडित असलेले विवाद लवकरच संपुष्टात येऊ शकतात. 
 
मीन राशी
या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी फारच उत्तम राहणार आहे. जीवनात तुम्हाला सुख शांतीचा अनुभव होईल. जमीन, घर व स्थायी मालमत्तेशी निगडित कार्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर तुमची एखाद्या व्यवहाराची बोलणी सुरू असेल तर त्यात तुम्हाला सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता आहे. व्याज किंवा उधार दिलेले पैसे परत मिळण्याची उमेद आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळू शकते. तुम्ही मानसिकरूपेण शांत अनुभवाल. समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. ऐकून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. पिता पुत्राचे नाते अधिक घट्ट होईल. या आठवड्यात बर्‍याच बाबतीत चर्चा होऊ शकते.