मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (16:30 IST)

कुंभ वार्षिक राशि भविष्य 2022 Aquarius Yearly Horoscope 2022

कुंभ राशिफल 2022 नुसार हे वर्ष या राशीच्या जातकांसाठी साधारणपेक्षा उत्तम असणार आहे. या वर्षात करिअर मध्ये मिळणारे यश आणि आपले परिश्रम आपल्या आयुष्यात  मोठे बदल घडवून आणणार आहे. वर्षांच्या सुरुवातीचे चार महिने राशी स्वामी शनी स्व राशीत गोचर करणार आहे. या मुळे निर्णय क्षमता चांगली असेल. या शिवाय या राशीच्या जातकांना समाजातील काही महत्वपूर्ण परिस्थितीला सामोरी जावे लागणार. चला कुंभ राशीच्या जातकाचे वार्षिक भविष्य जाणून घेऊ या.
 
कुंभ राशीफळ 2022 नुसार, या वर्षात करिअरमध्ये यश मिळेल परंतु शनीच्या प्रभावाखाली काहीशी आळसी प्रवूत्ती राहील.आळस त्यागला तर यश मिळणे निश्चित आहे. आर्थिक जीवनात वर्षभर वेगवेगळ्या संपर्काने धन मिळवाल. या काळात राशीचा स्वामी धनाच्या दुसऱ्या घरावर प्रभाव टाकत आहे. या मुळे आर्थिक घनलाभ होईल. कर्ज घेतले असेल तर ते फेडण्यास यशस्वी व्हाल.
 
या राशीच्या जातकांच्या कौटुंबिक जीवनासाठी हे वर्ष सामान्य फळ देणारे असेल.पितृ पक्षाकडून आपणास सहयोग मिळेल. कौटुंबिक सौख्याच्या घरात राहू विद्यमान असल्यामुळे वर्षाचा सुरुवातीचा काळ कौटुंबिक वादापासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ चांगला असणार. विद्यार्थी वर्गाला आळस सोडून परिश्रम करावे लागणार.
 
या राशीच्या प्रेमी जातकांना प्रेम संबंधाच्या दृष्टीने हा काळ प्रियकरासह लग्नगाठ बांधली जाणार यामुळे जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. विवाहित जातकांना आपल्या जोडीदाराच्या भावना जपण्याचा सल्ला देण्यात येत आहे. या राशीच्या जातकांनी शब्दाचा वापर जपून करावा. सासरच्या मंडळींना अपमानित करू नये. कुंभ राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने काही मोठा त्रास होणार नाही. तरीही मानसिक तणावाला सामोरी जावे लागू शकते. याचा नकारात्मक परिणाम आपल्या स्वभावावर पडेल. स्वभावात चिडचिड होईल.
 
कुंभ राशिभविष्य 2022 नुसार आर्थिक जीवन
या राशीच्या जातकांच्या आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर या वर्षात सामान्यांपेक्षा चांगले फळ मिळतील. विशेषत : वर्षाच्या सुरुवातीस 16 जानेवारी ला मंगळाचे धनु राशीत होणारे गोचर आपल्या जीवनात सकारात्मक आर्थिक बदल घेऊन येणारे ठरेल. भाग्य साथ देईल. वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक लाभ होईल. सर्वप्रकारच्या आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळेल. मार्च महिना नंतर चा काळ चांगला आहे. या काळात राशी स्वामी स्वतःच्या राशीत असेल. हे आर्थिक लाभ मिळवून देईल. पूर्वीच्या गुंतवणुकी पासून चांगले उत्पन्न होईल.
 
या राशीच्या जातकांचे मार्चच्या सुरुवातीपासून अनुकूल योग तयार होतील.आर्थिक स्थिती सुधारेल.अडकलेले पैसे मिळतील. या काळात रखडलेले पैसे मिळण्याची शक्यताआहे. या वर्षी खर्च देखील वाढतील. राशीचा स्वामी खर्चाचा द्वादश भावात विद्यमान राहणार. एखाद्या नवीन योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा. या राशीचे जातक घरासाठी किव्हा स्वतःसाठी काहीसे पैसे खर्च करू शकतात. परदेशी संपर्कातून आणि स्रोतातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. 
 
एप्रिलच्या मध्यकाळात राहूचे मेष राशीत होणारे स्थान परिवर्तन राशींचा तृतीय भावाला सक्रिय करेल. या काळात पैशाचा मोह करू नका या काळात जलद गतीने पैसे कमविण्याच्या प्रलोभनाला बळी पडू नका अन्यथा तोटा संभवतो. वर्षांचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा काळ अकराव्या घरातील स्वामी गुरूच्या आशीर्वादामुळे आर्थिक लाभ होईल. या राशीच्या काही जातकांना प्रवास घडून येतील. प्रवासातून लाभ मिळेल.
 
कुंभ राशिभविष्य 2022 नुसार आरोग्य
कुंभ आरोग्य राशीभविष्य 2022 च्या दृष्टीने येणारे नवीन वर्ष सामान्य फळ देणार आहे. वर्षाच्या सुरुवातीस जानेवारीच्या मध्यकाळापासून मानसिक त्रास संभवतो. या काळात बाराव्या घरात हानिग्रहांचे गोचर होणार. फेब्रुवारी ते मे पर्यंतचा काळ बाह्य समस्यांना समोरी जाण्याचा आहे. या काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. अधिक तणाव घेणे टाळा. एप्रिलच्या मध्यकाळात छायाग्रह राहूचे मेष राशीत गोचर होऊन या राशीच्या तिसऱ्या घरात विद्यमान असेल. यामुळे एप्रिलच्या मध्यापासून ते जून महिन्यापर्यंत भाऊ बहिणीच्या आरोग्यासाठी कष्टदायक होईल. त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. किरकोळ त्रासासाठी देखील त्वरित डॉक्टरांचा परामर्श घ्या.
 
मे ते ऑक्टोबरपर्यंतच्या काळात मंगळआपल्या राशीच्या दुसऱ्या, तिसऱ्या,चवथ्या, आणि पाचव्या भावात गोचर करणार. हा काळ जीवनात सकारात्मकता आणि ताकद आणणारा ठरेल. एखाद्या पूर्वीच्या त्रासापासून मुक्त व्हाल. जुलै आणि ऑगस्ट काळात जुलैच्या सुरुवातीचा महिन्यात चतुर्थ भावाचा स्वामी स्वभावात अनुकूल परिस्थितीत असणार. या मुळे माताच्या आरोग्यामध्ये सुधारणा संभवते. त्यांना काही आरोग्याच्या तक्रारी असतील तर सर्व त्रासापासून मुक्ती मिळण्याचे योग संभवतात. मात्र वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर मध्यें पोटाशी निगडित काही त्रास उद्भवू शकतात. कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 
कुंभ राशिभविष्य 2022 नुसार करिअर
करिअर राशीभविष्य 2022 नुसार हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात धनु राशीतील मंगळाचे गोचरआपल्या  लाभाच्या अकराव्या स्थानावर  परिणाम करेल. हे करिअरच्या बाबतीत अफाट यश मिळवून देईल. विशेषत: व्यावसायिकांना हा काळ उत्तम नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात करणाऱ्यांसाठी तर जानेवारी ते मे हा काळ अनुकूल असेल.  नोकरी करणाऱ्यांना या काळात चांगली बढती मिळण्याची शक्यता आहे.
 
एप्रिल महिन्यापासून लग्नभाव सक्रिय होऊन शनीचे गोचर आपल्या राशीत होणार. शनी पूर्वी केलेला कार्यासाठी अनुकूल परिणाम देतील. आळस वाढेल .आळस त्यागून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. भागेदारी च्या व्यवसायात असणाऱ्या या राशीच्या जातकांना भागीदाराशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. खोटं बोलणे टाळा. सप्टेंबर, ऑक्टोबर, आणि नोव्हेंबर महिन्यात दशम भाव चे स्वामी चतुर्थ आणि पंचम भावात गोचर करतील. हा काळ कामावर आणि उत्पन्नावर प्रभाव पाडणारा  ठरेल. नोकरदार वर्गाच्या जीवनात अनेक बदल घडून येतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी होणाऱ्या वादामुळे काही जातकांना तोटा संभवतो. 
 
वर्षाचा अखेरचा काळ करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम ठरेल. परदेशी व्यवहार करत असाल किंवा एखाद्या मल्टी नेशनल कंपनी मध्ये कामाला असाल तर नोव्हेंबरपर्यंतचा काळ अनुकूल असणार. राशीचा स्वामी शनी परदेश स्थानात असेल. हे चांगले परिणाम देईल. परदेश गमन करणाऱ्या जातकांसाठी हा काळ यशाचा आहे. 
 
कुंभ राशिभविष्य 2022 नुसार शिक्षण
कुंभ राशीनुसार 2022 हे वर्ष या राशीच्या जातकांसाठी शैक्षणिक दृष्टीने चांगले राहील. वर्षाच्या सुरुवातीला मंगळाची दृष्टी राशीच्या पंचम घरात पडणारी आहे विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक भावना वाढेल. अभ्यासात गती येईल. परीक्षेत चांगले परिणाम मिळविण्यासाठी अधिक परीश्रम करावे लागणार. 26  फेब्रुवारी पासून मंगळाचे राशीच्या बाराव्या घरात होणारे बदल शिक्षणासाठी अधिक परिश्रम करण्याचा सल्ला देत आहे.
 
एप्रिलच्या मध्यापासून शनी स्वतःच्या राशीत विद्यमान असणार. या मुळे विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागणार. या काळात शनीची दृष्टी स्वतःच्या राशीवर असल्यामुळे विद्यार्थी वर्गाला शिक्षणाच्या दृष्टीने काही समस्यांना सामोरी जावे लागू शकते. त्यांचे मन गोंधळू शकते .अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. गुरुची दृष्टी स्पर्धा भावावर पडणारी आहे. स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उत्तम असेल. सेप्टेंबर ते नोव्हेंबरचा काळ प्रत्येक कामात यश मिळवून देण्यासह एखाद्या चांगल्या ठिकाणी किंवा संस्थेत नोकरी मिळवून देणारा आहे. वर्षाचा शेवटी उच्च शिक्षणाचे चांगले योग घेऊन येणारा आहे. 
 
कुंभ राशिभविष्य 2022 नुसार कौटुंबिक जीवन
या वर्षी या राशीच्या जातकांना कौटुंबिक जीवनात सामान्य फळ मिळेल. काही विशेष बदल होणार नाही. जानेवरी ते मार्चचा मध्यकाळ पारिवारिक मतभेदांना समोरी जावे लागणार. वर्षाच्या सुरुवातीस मंगळाची दृष्टी कुटुंबाचा घरावर असल्यामुळे मानसिक ताण तणावात वृद्धी होईल. या काळात पितृ पक्षाकडून सहयोग मिळेल. या मुळे  बऱ्याच प्रमाणात स्वतःला सामान्य ठेऊ शकाल.
 
या वर्षात छायाग्रह राहू चे गोचर मेष राशीत आणि शनीचे गोचर कुंभ राशीत होणार. ही परिस्थिती कौटुंबिक जीवनावर प्रभाव पाडणारी आहे. स्वभावात हट्टीपणा येईल. या राशीच्या काही जातकांना कौटुंबापासून दूर जावे लागणार. वर्षाच्या पहिल्या काही महिन्यात वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.कोर्ट कचेरी पासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे हे आपल्या कुटुंबासाठी योग्य ठरेल.
 
जून ते सेप्टेंबरचा काळ कुटुंबापासून दूर होण्याचा योग्य दर्शवत आहे. ऑगस्ट महिन्यात मंगळाची दृष्टी चवथ्या घरावर पडणार. हे घरापासून लांब राहण्याचे योग घडवून आणणारी आहे. कौटुंबिक नातं अधिक दृढ होण्याचे योग आहे. वर्षाचे शेवटचे तीन महिने म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये भाऊ बहिणींची साथ मिळेल .गुरु कौटुंबाच्या दुसऱ्या घरात असल्यामुळे गुरुचे पाठबळ आणि आशीर्वाद मिळाल्यामुळे घरात वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद मिळेल. वर्षाचा हा काळ उत्तम ठरणार आहे .या काळात कुटुंबियांकडून मान सन्मान मिळेल.
 
कुंभ राशिभविष्य 2022 नुसार वैवाहिक जीवन
कुंभ राशी भविष्य 2022 नुसार, कुंभ राशीच्या विवाहित लोकांसाठी हा काळ संमिश्र फळ घेऊन येणार आहे. वर्षाच्या सुरुवातीच्या काळात काही त्रास संभवतात तर, वर्षाच्या उत्तरार्धात, गोष्टी सुधारल्यासारखे वाटतील. जोडीदाराची साथ आणि प्रेम मिळाल्यामुळे नात्यात नवीनता अनुभवाल. भूतकाळातील काही वाद असल्यास जानेवरीचा काळात सर्व वाद संपतील. या शिवाय जानेवरी ते एप्रिलचा काळ जोडीदार आणि सासरच्या मंडळींकडून तणाव देणारा आहे. मार्चच्या महिन्यात आपल्या लग्नाच्या घरात आठव्या घराचे स्वामी बुधाची दृष्टी पडेल. या मुळे नात्यात गैसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात स्वतःला मानसिक तणावांनी वेढलेलं पहाल.
 
वर्षाचा मध्यकाळ म्हणजे जून आणि जुलै महिन्यात दोघांमध्ये तडजोड करावी लागेल. त्या नंतर सप्टेंबर महिन्यात दोघांमधील प्रेम बहरून निघेल. एकमेकांवरील प्रेम आणि विश्वास वाढेल. या वर्षाची ग्रहस्थिती सांगत आहे की मे ते डिसेंबर चा काळात आपण दोघे एखाद्या धार्मिक स्थळी किंवा सहलीला जाण्याची योजना आखू शकता. दोघांमधील प्रेम बहरून निघेल. नवविवाहित जातक आपल्या कुटुंबाला वाढविण्याचा विचार करू शकतात. 
 
कुंभ राशिभविष्य 2022 नुसार प्रेम जीवन
प्रेम राशिभविष्य  2022 नुसार, हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधांमध्ये अनुकूलता आणणार आहे.कारण या वर्षी आपण आपल्या प्रियकराला पूर्णपणे आनंदी ठेवण्यात सक्षम असाल. यामुळे आपल्या मधील नाते अधिक चांगले होईल. या वर्षात आपल्या  नात्यात प्रेम वाढेल. काही जातक आपल्या प्रियकराला जोडीदार म्हणून निवडतील. 
 
एप्रिल मध्ये शनीचे  होणारे गोचर काही अडचणी देऊ शकतात. या काळात शब्दांना जपून वापरा. कोणत्याही कामात घाई करू नका. या नंतर एप्रिल पासून मीन राशीत गुरुचे गोचर झाल्यामुळे या राशीचा द्वितीय भाव प्रभावित होइल. परिणामी परिस्थिती अनुकूल बनेल. या राशीचे काही जातक प्रेम विवाह करण्याचा निर्णय घेतील. जून नंतरचा काळ पंचम भावातील स्वामी बुध स्वतःच्या घरात विद्यमान असतील. हे आपल्या नात्यात यश मिळवेल. या काळात आपण प्रियकराशी मन मोकळे पणाने बोला त्याला समजून घ्या. असं केल्याने आपल्यामधील असलेले सर्व गैरसमज नाहीसे होतील आणि आपले नाते अधिक दृढ होतील. 
 
ज्योतिषीय उपाय
या वर्षी नियमितपणे शनिदेवाची पूजा करावी आणि विधीनुसार सात मुखी रुद्राक्ष धारण करावे.
दर शनिवारी गाईला गूळ आणि पोळी  खाऊ घाला आणि त्यांच्या पायांची धूळ कपाळावर लावल्यास अपार यश मिळेल.
जीवनात फायदेशीर परिणामांसाठी, शनिवारी लोखंड दान करा.