सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (15:51 IST)

धनु वार्षिक राशि भविष्य 2022 Sagittarius Yearly Horoscope 2022

धनु राशिफल 2022 नुसार ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती सूचित करत आहे की येणारे नवीन वर्ष धनु राशीच्या लोकांसाठी प्रगती आणि अनेक मोठे बदल घेऊन येत आहे. असे आढळून आले आहे की धनु राशीचे लोक सामान्यतः स्वभावाने थोडे भटके असतात. हे लोक आयुष्यातील सर्व नवीन आव्हाने सहजासहजी स्वीकारू शकत नाहीत आणि अनेकदा त्यामुळे अस्वस्थ होतात आणि या वर्षीही त्यांच्या बाबतीत असेच काही घडणार आहे. विशेषत: आरोग्य जीवनात या वर्षात आपल्याला काही विशेष त्रास होणार नाही. परंतु असे असूनही, आपणास आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. कारण भूतकाळातील आपल्याला होणाऱ्या काही गंभीर आजारामुळे मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
जर करिअर बद्दल बोलायचे झाले तर धनु राशीच्या लोकांसाठी 2022 हे वर्ष करिअरच्या दृष्टीने संमिश्र असेल. कारण वर्षाच्या मध्यात आपल्या राशीच्या पहिल्या भावात मंगळ असल्यामुळे आपल्यावर मंगळ ग्रहाचा आशीर्वाद असेल, ज्यामुळे आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती आणि पदोन्नती मिळेल. तर त्याच वेळी, अनेक विरोधी ग्रहांच्या प्रभावामुळे आपल्याला कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. आर्थिक जीवनातही या वर्षी आपल्याला भरघोस यश मिळेल. कारण हा काळ आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमविण्यास सक्षम बनवेल.
 
धनु राशीचे जातक मैत्री जपण्यात खूप निष्ठावान असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत, धनु राशी भविष्य वर्ष 2022 प्रेम प्रकरणांसाठी नेहमीपेक्षा चांगले असणार आहे. या वर्षी, विशेषत: प्रेमात असलेल्या लोकांच्या प्रेम जीवनात चांगले बदल दिसून येतील. तथापि, त्यांना त्यांच्या प्रियकराशी संभाषण करताना शब्दांमध्ये खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा प्रियकर रागावू शकतो. जर आपण विवाहित असाल तर आपल्याला या वर्षी सामान्य परिणाम मिळतील. जोडीदाराचे खराब आरोग्य आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतं.
 
जर आपण कौटुंबिक जीवन समजून घेत असाल तर मंगळाचा शुभ प्रभाव आपल्या कुटुंबात सौख्य समृद्धी आणण्यास मदत करेल. या मुळे आपण शांत वातावरणाचा आनंद घेऊ शकाल. पण जर आपण विद्यार्थी असाल तर या वर्षी आपल्याला अभ्यासात थोडे जास्त लक्ष द्यावे लागेल. कारण तरच आपण प्रत्येक परीक्षेत चांगला निकाल मिळवू शकाल.
 
धनु राशिभविष्य 2022 नुसार आर्थिक जीवन
धनु राशीच्या लोकांच्या आर्थिक जीवना विषयी बोलावे तर पैशाशी संबंधित बाबींमध्ये या राशीच्या जातकांना या वर्षी अनुकूल परिणाम मिळतील. विशेषत: वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीच्या मध्यात धनु राशीतील मंगळाचे गोचर आर्थिक स्थिती मजबूत करेल. असे असूनही, या राशीच्या जातकांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा भविष्यात आर्थिक संकटाला सामोरी जावे लागू शकते. 
 
एप्रिलपासून, बृहस्पति देखील स्वतःच्या राशीत मीन राशीत गोचर करणार, जे आर्थिक जीवनात अनेक सकारात्मक बदल दर्शवत आहे. या काळात विविध माध्यमातून पैसे मिळू शकतील. कारण हे दोन्ही ग्रह आपल्या अधिकाराच्या दशम भावात दृष्टी टाकतील. सरकारी क्षेत्रातून आपणास धनलाभ मिळू शकते. 
 
परंतु दरम्यान या काळात आपल्याला सर्व प्रकारच्या बेकायदेशीर कामांपासून दूर राहावे लागेल, अन्यथा मानसिक ताणतणाव वाढून हे आपल्या त्रासाला कारणीभूत होऊ शकते. याशिवाय या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत नवम भावात बुधाचे गोचर अचानक आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत देत आहे. यानंतर, वर्षाच्या अखेरच्या 2 महिन्यांत म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये, पुन्हा खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत आहे. कारण या काळात अकराव्या घराचा स्वामी द्वादश भावातून चंद्र राशीत गोचर करेल.
 
धनु राशिभविष्य 2022 नुसार आरोग्य
आरोग्य जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, धनु राशि भविष्य 2022 नुसार, या वर्षात धनु राशीच्या जातकांना आरोग्याशी संबंधित सकारात्मक परिणाम मिळतील.या राशीच्या द्वितीय भावात शनिची उपस्थिती विशेषत: वर्षाच्या सुरुवातीला काही किरकोळ समस्या उद्भवू  शकतात. परंतु या काळात कोणत्याही मोठ्या आजाराचा त्रास होणार नाही आणि आपण आनंददायी आणि आरोग्यदायी जीवनाचा आनंद लुटणार.
 
एप्रिलच्या मध्यापासून ते जूनपर्यंत, या राशीच्या जातकांना व्यस्त जीवनातून वेळ काढून शारीरिक विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. या काळात आपण आपल्या आईची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण  द्वादश भावाचा स्वामी मंगळाची दृष्टी आपल्या मातृभावा कडे पाहतील. यामुळे दीर्घकाळापर्यंत चालणारे काही त्रास सहन करावे लागतील. या मुळे मानसिक ताणात वाढ होऊ शकते. याशिवाय जून ते ऑक्टोबर पर्यंत शुक्राचे गोचर सहाव्या भावात म्हणजे रोग भावात काही संसर्ग देऊ शकतात. अशा परिस्थितीत, शक्य तेवढे स्वतःचे सर्व प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करा. नोव्हेंबर ते डिसेंबर कालावधीत वाहन खबरदारीने चालवण्याचा सल्ला दिला जातो. कारण या काळात लाल ग्रह मंगळ राशीच्या सहाव्या भावात असणार, या मुळे एखादा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत, काही किरकोळ समस्या सोडल्या तर हे वर्ष धनुराशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने अतिशय अनुकूल जाणार आहे.
 
धनु राशिभविष्य 2022 नुसार करिअर
धनु राशीच्या लोकांचे करिअर बदल सांगायचे तर या राशीच्या लोकांसाठी 2022 हे वर्ष संमिश्र फळ देणार आहे. विशेषत: वर्षाच्या सुरुवातीला मंगळ आपल्या राशीत असेल जे आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती देईल. यानंतर एप्रिलपासून कार्यक्षेत्राच्या घरात बृहस्पतिची दृष्टी असल्याने प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पाडेल, आपल्या कार्यक्षेत्रात आपले उच्च अधिकारी आपल्या कामावर खुश होतील आणि आपले कौतुक करतील.
 
यानंतर एप्रिल ते सप्टेंबर या काळाच्या मध्य कुंभ राशीतील शनि ग्रहाचे गोचर विशेषत: नोकरदार वर्गांना शुभ फळ देणारे आहे. या काळातया राशीच्या जातकांना पदोन्नती मिळून त्यांचा पगारात वाढ होईल. पूर्वीचे अपूर्ण काम देखील या कार्यात पूर्ण करू शकाल. ऑक्टोबरनंतर परदेशी द्वादश भावाचा स्वामी प्रवासाच्या सातव्या भावात उपस्थित असेल. यामुळे या राशीच्या जातकांना कार्यक्षेत्राशी संबंधित परदेश गंमनाची संधी मिळेल.हा प्रवास जातकांसाठी फायदेशीर ठरेल. कारण या संधीमुळे नवीन ओळखी होतील या मुळे धन प्राप्तीचे योग येतील.वर्षाच्या शेवटी, नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या संस्थेतून नोकरीची संधी मिळेल. हे वर्ष व्यापारी वर्गासाठी देखील चांगली संधी घेऊन येणारा ठरेल.
 
धनु राशिभविष्य 2022 नुसार शिक्षण 
धनु राशीभविष्य 2022 नुसार, या वर्षात आपल्याला शिक्षण क्षेत्रात उत्तम परिणाम मिळण्याचे संकेत मिळत आहे. वर्षाच्या सुरूवातीस शिक्षणाचा पंचम भावाचा स्वामी चतुर्थ आणि पंचम भावावर दृष्टी टाकेल, हे आपल्याला चांगले परिणाम देईल .फेब्रुवारी ते जून चा काळ प्रत्येक परीक्षेत यश मिळविण्याचा काळ आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगली बातमी घेऊन येणारा ठरेल. या  काळात आपण सर्व विषय नीट समजून आणि लक्षात ठेवू शकाल.या मुळे आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षेत भरघोस यश मिळेल. 
 
जून महिन्यानंतर ऑगस्ट चा काळ बृहस्पती अष्टम घरात दृष्टी टाकणार आहे. आठव्या घरात असलेला गुरु विशेषत: विद्यार्थ्यांसाठी काही समस्या निर्माण करू शकतो. या काळात विद्यार्थ्यांचे मन विचलित होऊ शकते. अशा परिस्थितीत मनावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. तसेच गरज असेल तेव्हा मित्र, गुरू आणि शिक्षक यांची मदत घ्या. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उन्नतीचा ठरणार आहे. या राशीच्या लग्न घराच्या स्वामींची दृष्टी या राशीच्या जातकांवर पडणार आहे. या मुळे या राशीच्या विध्यार्थी जातकांना हा काळ उत्तम ठरणार आहे. 
 
वर्ष 2022 चा सप्टेंबर ते नोव्हेंबर काळ उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला ठरणार आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी वर्षाच्या शेवटी  एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
 
धनु राशिभविष्य 2022 नुसार कौटुंबिक जीवन
या वर्षी या राशीच्या जातकांना सौख्य आणि ऐशवर्य प्राप्तीचे योग आहे. घरातील वाद विवाद समजुतीने सोडवण्यात यश मिळेल. वर्षाच्या सुरुवातीचा काळ सावधगिरी बाळगावी लागणार .मंगळाची दृष्टी आपल्या कौटुंबिक सौख्यावर टाकणार या मुळे आपल्याला मानसिक ताण येऊ शकतो. पण मंगळाची दृष्टी आपल्या सातव्या घरावर असल्यामुळे आपल्याला सर्व तणावापासून मुक्ती मिळेल.
 
वर्षाच्या  एप्रिल महिन्यात शनी ग्रहाचे स्वतःच्या राशीत होणारे गोचर या राशीच्या जातकांना काही कारणास्तव घरापासून लांब करू शकते. यामुळे तणावात वाढ होण्याची शक्यता आहे. काळानंतर गोष्टी सुधारतील .बृहस्पतीचे मिन राशीत होणारे गोचर आपल्या चतुर्थ घरावर परिणाम करतील यामुळे कौटुंबासाठी आपली ओढ वाढेल. आपले संबंध आपल्या मुलांशी सलोख्याचे होतील. या मुळे कुटुंबात आपली छवी सुधारेल. सप्टेंबर ते नोव्हेंबरचा काळ आपल्या लहान भावंडांसह घालवाल. 
 
धनु राशिभविष्य 2022 नुसार वैवाहिक जीवन
या राशीच्या विवाहित लोकांसाठी हा काळ सामान्य असेल. वर्षाच्या सुरुवातीस जानेवारी पासून फेब्रुवारी पर्यंतचा मध्यकाळ स्वतःच्या राशीत असणारा मंगळ या राशीच्या काही जातकांचे जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. या जातकांना सल्ला देण्यात येत आहे की आपण जोडीदारासह बोलून प्रत्येक वाद सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करा. 
 
जानेवरी ते फेब्रुवारीचा मध्यकाळ मकर राशीत सूर्य आणि शनीची होणारी युती वैवाहिक जीवनावर परिणाम करेल. यामुळे आपले वाद वाढतील आणि याचा परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर पडेल. आपण आपल्या बोलण्यामुळे आपल्या जोडीदाराला दुखवू शकता. शब्दांचा वापर जपून करावा.
 
वर्षाच्या जून आणि जुलै महिन्यात परिस्थितीत सुधारणा होईल. आपले आणि जोडीदारांमधील प्रेम पुन्हा बहरून निघेल. या काळात सप्तम भावाचे स्वामी जुलै महिन्यात स्वघरात गोचर करतील. वर्षाच्या अखेरीस आपल्या राशीच्या चतुर्थ घरात असणारा बृहस्पती वैवाहिक सौख्य मिळवून देईल. या काळात काही राशीचे जातक जोडीदारासह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल.
 
धनु राशिभविष्य 2022 नुसार प्रेम जीवन 
या राशीच्या जातकांना प्रेम जीवनात चांगले परिणाम मिळणार आहे. या वर्षातून दोनवेळा प्रेमभावाचा स्वामी वैवाहिक भावाला प्रभावित करणार. या राशीचे काही जातक आपल्या प्रियकरासह वैवाहिक बंधनात अडकणार. वर्षाच्या सुरुवातीस मंगळाची या राशीच्या जातकांच्या प्रथम भावात असणारी उपस्थिति प्रियकराशी मतभेद होण्याचे संकेत देत आहे. या मुळे भावनात्मक दृष्टया आपण ढासळू शकता. असं होऊ नये या साठी आपल्याला स्वभावात बदल करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 
 
फेब्रुवारी ते एप्रिलचा मध्यकाळ प्रियकरासह एखाद्या सहलीला जाताना आपसातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न कराल. या मुळे नात्यात नवीनता येईल आणि आपले नाते अधिकच दृढ होतील. आपल्या नात्यात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचे हस्तक्षेप नात्यात बिघाड आणू शकतात. आपल्या नात्यात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका. वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर , नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरम्यान, या राशीचे जातक प्रियकराची भेट कुटुंबाच्या सदस्यांशी करण्याचा निर्णय घ्याल. या राशीच्या अनेक जातकांना कुटुंबीयांचा सहयोग मिळेल. हे त्यांच्या प्रेम बंधनाला अधिक दृढ करेल. आणि प्रेम बंधनात बांधले जाण्याची शक्यता आहे. 
 
ज्योतिषीय उपाय-
नियमितपणे दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी. यामुळे या राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी प्रगती करता येईल.
सर्वोत्तम फायदे मिळविण्यासाठी, तीन मुखी किंवा पंचमुखी रुद्राक्ष धारण करू शकता.
विशेषत: गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करणे आणि भगवान विष्णूची पूजा करणे देखील फायदेशीर ठरेल.
सर्व प्रकारच्या आरोग्य समस्यांसाठी दररोज हळदीच्या पाण्याने आंघोळ करावी.