शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Updated : सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (16:23 IST)

मकर वार्षिक राशि भविष्य 2022 Capricorn Yearly Horoscope 2022

मकर राशिभविष्य 2022 नुसार मकर राशीच्या जातकांना येणाऱ्या वर्षात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. हे निर्णय घेणे आपल्यासाठी सहज होणार नाही. हे निर्णय आपल्या आयुष्यात मोठे बदल घेऊन येतील. आम्ही आपल्यासाठी वर्ष 2022 चे वार्षिक राशी भविष्य फळ  घेऊन येत आहोत. हे वार्षिक राशीफळ आपल्याला आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट काळाची माहिती देणार. त्यामुळे आपण येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरी जाण्यास सज्ज असाल. या लेखाच्या शेवटी आम्ही काही ज्योतिषी उपाय देखील सांगत आहोत. ज्यांना अवलंबवून आपण सकारात्मक परिणाम मिळवू शकाल.
 
मकर राशीच्या जातकांसाठी करिअर बद्दल बोलायचे तर येणाऱ्या वर्षात धनप्राप्तीचे चांगले योग येत आहे. कार्यक्षेत्रावर शनी देवाची दृष्टी असल्याने कामाचा ताण वाढू शकतो. विशेषतः नौकरदार वर्गासाठी हा काळ आपल्या लक्ष्यांवर केंद्रित करणारा काळ असेल.
 
कौटुंबिक जीवना बद्दल बोलायचे तर या राशीच्या जातकांसाठी हे वर्ष 2022 सामान्य फळ देणारे आहे. या काळात आरोग्याचा द्वादश भावाचा स्वामी आपल्या वडिलांच्या नवम भावात दृष्टी टाकणार आहे. या मुळे वडिलांना आरोग्य विषयक त्रास संभवतो. यामुळे या राशीच्या जातकांना मानसिक त्रास संभवतो. विद्यार्थी वर्गाला हा काळ त्यांच्या आयुष्यात काही बदल घेऊन येणारा ठरणार आहे. परीक्षेत चांगला परिणाम मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागणार. अन्यथा हे त्रासदायक ठरू शकतं.
 
या राशीच्या जातकांच्या प्रेम संबंधा बद्दल बोलायचे झाले तर या वर्षी प्रेम संबंधावर  राहूची दृष्टी पडणार आहे. या राशीच्या जातकांच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव होईल. या राशीचे अनेक जातक वर्षांत प्रियकरासह लग्नाच्या बंधनात बंधणार. या राशीच्या विवाहित जातकांना वैवाहिक जीवनात काही समस्यांना सामोरी जावे लागू शकते. कारण या वर्षात आपण आपल्या अधिकारासाठी संघर्ष कराल. मकर राशीच्या जातकांना आरोग्याशी संबंधित काही समस्या उदभवू शकतात. विशेषतः पोटाशी आणि पचन संस्थेशी संबंधित काही त्रास उदभवू शकतात.
 
मकर राशिभविष्य 2022 नुसार आर्थिक जीवन 
या वर्षी मकर राशीच्या जातकांच्या आयुष्यात आर्थिक जीवनात सकारात्मक परिणाम मिळतील. या राशीचा स्वामी शनीची वर्षाच्या सुरुवातीस आपल्या राशीत उपस्थित उत्पन्नात वाढ होण्याचे योग दर्शवत आहे. आपणास वेगवेगळ्या माध्यमातून धनप्राप्ती होऊ शकते. जानेवरीच्या मध्यात मंगळाचा गोचर आपल्या राशीच्या द्वादश भावात होणार. यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार. या काळात पैसे साठवून ठेवण्यास अडचणी येऊ शकतात. या मुळे आपले त्रास वाढू शकतात.
 
एप्रिल महिन्यात गुरु, शनि आणि छायाग्रह राहू या तीन ग्रहांच्या स्थानात बदल होणार आहे, अशा स्थितीत या राशीच्या जातकांना उत्पन्नाच्या बाबतीत सर्वाधिक सतर्क राहण्याची सूचना देण्यात येत आहे.
एप्रिलच्या शेवटी शनिचा गोचर कुंभ राशीत झाल्यामुळे, एप्रिलपासून  मागील वर्षापेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. अन्यथा, आर्थिक अडचणींना सामोरी जावे लागणार. पैसे मिळविण्यासाठी सतत मेहनत करत रहा.
 
याशिवाय एप्रिल महिन्यात मीन राशीमध्ये गुरूची उपस्थिती अनेक सुंदर योग बनवेल. परिणामी तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल आणि एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत  केलेल्या मेहनतीनुसार या राशीच्या जातकांना चांगले परिणाम मिळू शकतील. या काळात, नवीन नोकरी किंवा पदोन्नतीद्वारे उत्पन्न वाढवू शकाल.
 
मकर राशिभविष्य 2022 नुसार आरोग्य
आरोग्य जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, मकर राशि भविष्य 2022 नुसार, या वर्षी या राशीच्या जातकांना आरोग्याशी संबंधित सामान्य परिणाम मिळतील. विशेषत: सुरुवातीच्या काळात, छाया ग्रह राहू राशीच्या पंचम भावात विराजमान असेल, आपल्याला आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. भूतकाळातील एखादे जुने विकार उद्भवू शकतात. यानंतर एप्रिल महिन्यात शनि स्वतःच्या कुंभ राशीत असल्यामुळे काहीसा परिणाम आपल्या राशीवरही होईल. परिणामी काही किरकोळ समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. जुन्या आजारापासून शनिदेव मुक्त  करतील. अशा परिस्थितीत चांगले अन्न खा आणि आपल्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घ्या.
 
सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्याच्या मध्यकाळात द्वादश भावाचा स्वामी गुरु बृहस्पती सप्तम भावावर दृष्टी टाकणार. या काळात या राशीच्या जातकांना पोटाशी संबंधित विकार उद्भवू शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्या.योग्य चिकित्सकाचा परामर्श घ्या. आरोग्याच्या दृष्टीने जुलै पर्यंतचा काळ चांगला असणार. आरोग्य उत्तम राहील. आपले सर्व मानसिक ताण देखील दूर होतील. वर्षाचा शेवटच्या टप्प्यात शनीचा प्रभाव असल्यामुळे आपण चांगल्या आरोग्याचा आनंद घ्याल.
 
मकर राशिभविष्य 2022 नुसार करिअर
 वर्ष 2022 मकर राशीच्या जातकांसाठी करिअरच्या दृष्टीने सामान्य जाणार आहे. जानेवरीच्या मध्यकाळात मंगळाचे धनु राशीत होणारे गोचर, द्वादश भावावर परिणाम टाकणार, अशा परिस्थितीत या राशीच्या जातकांना आपल्या ध्येयाकडे अधिक सतर्कता बाळगावी लागेल. एप्रिलच्या शेवटी शनिदेव स्वराशी कुंभ मध्ये उपस्थित असणार, या काळात या राशीच्या जातकांना आळस दूर करून अधिक परिश्रम करावे लागणार अन्यथा तोटा संभवतो.
 
या नंतर एप्रिल महिन्यात गुरु बृहस्पती, शनी आणि राहूचे होणारे गोचर या राशीच्या जातकांच्या कार्यक्षेत्रात त्रासदायक होणार. आपल्याला एप्रिल पर्यंत अधिक कष्ट करावे लागतील. एप्रिल ते ऑगस्ट पर्यंत परिस्थिती सुधारेल .याचे कारण असे  की आपण केलेले प्रयत्न आणि तृतीय भावाचा स्वामी उत्पन्न आणि लाभ स्थानावर दृष्टी टाकत आहे या मुळे आपल्याला मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळेल आपण कार्यक्षेत्रात आपल्या उच्चअधिकाऱ्यांना संतुष्ट करू शकाल.
 
नवी नौकरी शोधणाऱ्या जातकांना सप्टेंबर पासून वर्षाच्या अखेर पर्यंतचा काळ चांगला ठरणार आहे. षष्ठम भावाचा स्वामी बुध गोचर करत राशीच्या दशम, एकादश, आणि द्वादश भावात राहिल. या राशीच्या व्यावसायिकांसाठी वर्षाचा शेवटचा टप्पा भाग्यशाली ठरणार आहे.
 
मकर राशिभविष्य 2022 नुसार वैवाहिक जीवन
मकर राशींच्या विवाहित जातकांसाठी वर्ष 2022 हा काळ खूप उलाढाल घेऊन येणारा आहे. मे महिन्यात शुक्राचे स्वतःच्या राशीत होणारे गोचर या राशीच्या जातकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात जोडीदाराचे प्रेम आणि पाठिंबा मिळेल . वर्षाच्या सुरवातीचा काळ काही आव्हाने घेऊन येणारा असेल. यामुळे मानसिक तणावात वाढ होईल. आपण आपल्या जोडीदार आणि वैवाहिक जीवनात समाधानी दिसणार नाही. घरातील शांतता राखण्यासाठी जोडीदाराच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागणार.  
 
नात्यात कुठल्याही प्रकारचे गैरसमज होऊ देऊ नका. जोडीदाराशी असलेले सर्व मतभेद सप्टेंबर नंतर सर्वोत्तम ठरेल. आपण जोडीदाराशी मोकळे पणाने बोलून आपले मत यशस्वीरित्या मांडू शकाल. ऑगस्ट महिना संतान पक्षाचा पंचम भावाच्या स्वामीची सप्तम भावात उपस्थिती हे नवविवाहितांना चांगले फळ देणारे ठरेल या काळात या राशीचे जातक आपल्या कुटुंबाच्या वाढी साठी योग्य निर्णय घेऊ शकतात. वर्षाच्या अखेरीस सासर पक्षाशी नाते संबंध जपून जोडीदाराला आनंदी ठेवाल.
 
मकर राशिभविष्य 2022 नुसार प्रेम जीवन
मकर राशीच्या जातकांसाठी प्रेम जीवनात सामान्य परिणाम घेऊन येणारे ठरणार आहे. वर्षांची सुरुवात काहीशी कष्टकारी ठरणार आहे. या काळात संभ्रमाचे कारक ग्रह राहूची दृष्टी प्रेम संबंधाच्या पंचम भावात उपस्थित असेल. या मुळे गैरसमज निर्माण होतील. अशा परिस्थितीतून पळ न काढता प्रियकराशी बोलून सर्व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. 
 
यानंतर एप्रिल महिन्याच्या मध्यकाळात होणारे गुरूचे गोचर तिसऱ्या भावाला प्रभावित करेल. हा काळ आपल्या जीवनात काही सकारात्मकता आणेल आणि या काळात भौतिक सुखांचा आनंद घेत आपले नाते अधिक घट्ट करण्यासाठी उत्सुक असाल. आपला प्रियकर देखील यावेळी आपल्याला योग्य वेळ देईल. जून ते सप्टेंबर महिन्यात प्रेम जीवनावर पुन्हा काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात. ज्यामुळे दोघांमध्ये काही कारणाने शाब्दिक किंवा शारिरीकरित्या दुरावा येऊ शकतो. अशा वेळी या काळात प्रियकराशी फोनवरून वेळोवेळी बोलून नात्यातील प्रेम टिकवून ठेवा.
 
ऑक्टोबरचा महिना या राशीच्या जातकांसाठी प्रेमविवाहाचे योग घेऊन येणारा आहे. प्रेम संबंधाचा स्वामी ग्रह शुक्र अनुकूल स्थितीत असून कुटुंबाच्या चतुर्थ भावावर दृष्टी टाकत आहे या मुळे हा शुभ योग आहे. प्रियकराशी लग्न करायचा विचार करत असाल तर कुटुंबियांशी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावे. सेप्टेंबरच्या महिन्यात प्रियकराकडून वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या पूर्णपणे सहकार्य मिळेल. 
 
ज्योतिषीय उपाय
जीवनात यश मिळवण्यासाठी हनुमान चालिसाचा नियमित पाठ करा.
कर्मफल देणारा शनि आपल्या कुंडलीत बलवान बनवण्यासाठी शनिवारी माकडांना गूळ-हरभरा खाऊ घाला.
आरोग्याशी संबंधित सकारात्मक परिणाम मिळविण्यासाठी प्रत्येक मंगळवारी हनुमानजींना सिंदूर अर्पण करा.
कुटुंबात सुख-समृद्धीसाठी, विशेषत: शनिवारी गरीब आणि गरजूंना तेल दान करा.