शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. अयोध्या विशेष
Written By

#Ayodhya Verdict Live Update : मुस्लिमांना अयोध्यात पर्यायी जागा मिळणार

या ऐतिहासिक खटल्याच्या निकालानंतर राम जन्मभूमी न्यास कार्यशाळा परिसरात कुठलंही सेलिब्रेशन होणार नाही : विश्व हिंदू परिषद
ट्रस्ट स्थापन करण्यासाठी केंद्रानं योजना तयार करावी - सरन्यायाधीश
3 ते 4 महिन्यात ट्रस्ट स्थापन करून मंदिर उभारण्याचे काम सुरु आणि विवादित जागेवर मंदिर बांधण्यासाठी जागा हस्तांतरित करेल. 
सुन्नी वक्फ बोर्डाकडून निकालाचे स्वागत. 
वादग्रस्त जागा रामल्लाची. तर मुस्लिमांना अयोध्येत पर्यायी 5 एकर जागा द्यावी, सर्वोच्च न्यायालयाचा एकमताने निर्णय. 
सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा देण्यात यावी असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं.
न्यायालयाने आतील भाग आणि बाहेरचा भाग असे दोन हिस्से असून त्या आधारे निकालातील मुद्दे  सांगण्यास सुरुवात. 
मुस्लिमांना अयोध्यात पर्यायी जागा मिळणार, न्यायालयाची टिप्पणी 
मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलंय.
1956 पूर्वी हिंदूंकडून वादग्रस्त जागेवर पूजा, 1856-57 ला नमाज पठणाचे पुरावे नाहीत
सुप्रीम कोर्टामध्ये अयोध्या खटल्यात निकाल वाचन सुरु, इंग्रजांच्या भूमिकेमुळे हिंदू-मुस्लिम वाद - कोर्ट
चौथरा, सीता की रसोई यांचे अस्तित्व मान्य. पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणात 12व्या शतकातील अवशेष सापडले. 
धर्मशास्त्रात हस्तक्षेप करणं कोर्टासाठी अयोग्य ठरेल - सरन्यायाधीश
प्रभू रामाचा जन्म याच ठिकाणी झाला होता, अशी हिंदूची श्रद्धा आहे. तर मुस्लीम याला बाबरी मशिद मानतात. श्रद्धा ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, असं न्यायालायनं म्हटलं आहे.
 
सुप्रीम कोर्टामध्ये अयोध्या खटल्यात निकाल वाचन सुरु, चौथरा, सीता की रसोई यांचं अस्तित्व मान्य, रामलल्लाचा ऐतिहासिक ग्रंथांमध्ये उल्लेख - सुप्रीम कोर्ट
 
अयोध्या निकाल : राम मंदिर बाराव्या शतकातलं- पुरातत्त्व विभाग, वादग्रस्त जमिनीवर हिंदूंकडून पूजा सुरु होती - सुप्रीम कोर्ट , हिंदूंचा दावा खोटा नसल्याचं स्पष्ट - सुप्रीम कोर्ट
 
महाराष्ट्र पोलिसांकडून शांततेचं आवाहन
शांतता हा आपल्या देशाचा सर्वांत मोठा गुण आहे. आम्ही नागरिकांना आवाहन करतो की सोशल मीडियावर कोणतेही संदेश सत्यता न पडताळता फॉरवर्ड करू नये. कुठलेही अनुचित संदेश आढळल्यास १०० डायल करा. - महाराष्ट्र पोलीस
बाबरी मशीद रिकाम्या जागी बनली नव्हती, मशिदीखाली मोठी इमारत होती : सुप्रीम कोर्ट
निर्मोही आखाड्याचा दावा देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळला, निर्मोही आखाडा सेवक नाही, रामलल्लाला कायदेशीररित्या पक्षकार मानलं
अयोध्येत निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात
कुठल्याही क्षणी निकाल वाचनाला सुरुवात, कोर्टरुमचे दरवाजे उघडले
1946 साली फैजाबाद कोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी शिया वक्फ बोर्डाची याचिका फेटाळली 
काही मिनिटांमध्ये अयोध्या प्रकरणी निर्णय, सरन्यायाधीश रंजन गोगोई सुप्रीम कोर्टात पोहोचले
 
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्वाचा, निकाल कोर्टाचा, सरकारचा नाही, मात्र गोड बातमी येणार : संजय राऊत
 
पंढरीत कार्तिकी यात्रा सुरु, अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये कडेकोट बंदोबस्त
 
अयोध्येमध्ये सशस्त्र दल, आरपीएफ, पीएसीच्या 60 तुकड्या, 1200 पोलिस कॉंस्टेबल, 250 एसआय , 20 डेप्यूप्टी एसपी आणि 2 एसपी अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सोबतच डबल लेअर बॅरिकेटिंग, 35 सीसीटीव्ही आणि 10 ड्रोन कॅमेरा देखील लावण्यात आले आहेत, अशी माहिती डीजीपी आशुतोष पांडेय यांनी दिली आहे.
सर्वांनी शांतता राखावी, सरसंघचालक मोहन भगवतांचे आवाहन
अयोध्येचा निकाल आज येणार आहे, न्यायव्यवस्थेने न्यायोचित निर्णय देण्याची व्यवस्था केली आहे, सर्वांनी खुल्या दिलाने निर्णय स्वीकार करून शांतता कायम ठेवावी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाह