तसेच या खास प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया 'एक्स' वर लिहिले की, "अयोध्येत राम लल्लाच्या स्थापनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्व देशवासीयांना शुभेच्छा. शतकानुशतके त्याग, तपस्या आणि संघर्षातून बांधलेले हे मंदिर आपल्या संस्कृतीचा आणि अध्यात्माचा एक महान वारसा आहे. मला खात्री आहे की हे दिव्य आणि भव्य राम मंदिर विकसित भारताच्या संकल्पाच्या साध्यतेसाठी एक मोठी प्रेरणा बनेल.तसेच राम लल्ला यांच्या प्राण प्रतिष्ठानाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त, राम जन्मभूमी संकुलात विविध ठिकाणी तीन दिवसांचे उत्सव आयोजित केले जातील. मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमात दिवसभर अनेक धार्मिक विधी तसेच रामकथा आणि रामलीला सादरीकरणे समाविष्ट असतील. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भगवान राम लल्ला यांचा अभिषेक करतील.अयोध्या में रामलला की प्राण-प्रतिष्ठा की प्रथम वर्षगांठ पर समस्त देशवासियों को बहुत-बहुत शुभकामनाएं। सदियों के त्याग, तपस्या और संघर्ष से बना यह मंदिर हमारी संस्कृति और अध्यात्म की महान धरोहर है। मुझे विश्वास है कि यह दिव्य-भव्य राम मंदिर विकसित भारत के संकल्प की सिद्धि में एक… pic.twitter.com/DfgQT1HorT
— Narendra Modi (@narendramodi) January 11, 2025