गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By
Last Updated : रविवार, 14 एप्रिल 2024 (09:01 IST)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा

dr ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इतर लेखन व ग्रंथसंपदा पुष्कळ प्रमाणात आहे. तसेच ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, स्फुटलेख, लेख, वर्तमानपत्रे, भाषणे, पत्रे यांचा समावेश त्यांच्या लेखन साहित्यात होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठया प्रमाणात लेखन केले आहे. आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा एकूण 22 ग्रंथ आणि पुस्तिका, 10 निवेदने किंवा साक्षीपुरावे, 10 शोधनिबंध, 10 अपूर्ण राहिलेले ग्रंथ, लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिभाशाली व्यक्तिमत्व होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी या भाषांचे ज्ञान होते तसेच ते खूप मोठे विद्वान होते.

तसेच त्यांचे पुष्कळसे लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे. तसेच समाजसुधारणा आणि धर्मसुधारणा यांकडे आपल्या लेखनातून प्रामुख्याने लक्ष दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषण व लेखन साहित्याचे आतापर्यंत एकूण 22 खंड महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले असून पुष्कळ लेखन प्रकशित आहे.

तसेच मल्याळम भाषेत देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्याचे 40 खंडावर प्रकाशीत झाली आहे. काव्य, कथा, नाटक इत्यादी प्रकारच्या साहित्याची कोणतीही रचना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली नाही, पण त्यांनी लिहलेल्या लेखणीतून पुष्कळ साहित्याचे सृजन झाले आहे. व त्यांचे साहित्य इंग्रजी भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर तयार झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वर्तमानात प्रासंगिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य व विचार संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. आज देखील अनेक लोक त्यांच्या साहित्याशी कमी परिचित आहेत. तर जाणून घ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा 
 
ग्रंथसंपदा- 
1. ॲडमिनीस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी
2. दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया
3. द प्रोब्लेम ऑफ द रूपी: इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन
4. ॲन्हिलेशन ऑफ कास्ट
5. व्हिच वे टू इमॉन्सिपेशन
6. फेडरेशन वर्सेस फ्रिडम
7. पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया
8. रानडे, गांधी अँड जिन्नाह
9 .मिस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स
10. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स
11. कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट
12. व्हू वर द शुद्राज? हाऊ दे केम टू बी द फोर्थ वर्णा इन दि इन्डो-आर्यन सोसायटी
13. अ क्रिटीक ऑप द प्रोपोझल्स ऑफ कॅबिनेट मिशन फॉर इंडियन कोन्स्टिट्युशनल   
14. चेन्जेस इन सो फार ॲस दे अफेक्ट द शेड्युल्ड कास्ट्स (अनटचेबल्स)
15. द कॅबिनेट मिशन अँड दी अनटचेबल्स
16. स्टेट्स अँड माइनॉरिटीज
17. महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स
18. द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स
19. थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स: अ क्रिटीक ऑफ द रिपोर्ट ऑफ द स्टेट्स   
20. रिकग्नाईझेशन कमिशन
21. द बुद्धा अँड हिज धम्मा
22. रिडल्स इन हिंदुइझम
23. डिक्शनरी ऑफ द पाली लँग्वेज (पाली-इंग्लिश)
24. द पाली ग्रामर
25. वेटिंग फॉर अ व्हिझा (ऑटोबायोग्रफी)
26. अ पिपल ॲट बाय
27. अनटचेबल्स ऑर द चिल्ड्रेन ऑफ इंडियाज गेटो
28. कॅन आय बी अ हिंदू?
29. व्हॉट द ब्राह्मिन्स हॅव डन टू द हिंदुज
30. एसे ऑफ भगवद्गीता 
31. इंडिया अँड कम्युनिझम
32. रिव्हॉल्युशन अँड काउंटर-रिव्हॉल्युशन इन एन्शण्ट इंडिया
33. बुद्धा अँड कार्ल मार्क्स
34. कोन्स्टिट्युशन अँड कोन्स्टिट्युशनालिझम 
 
महान, विलक्षण, अद्भुत व्यक्तिमत्व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुष्कळ ग्रंथ लिहले तसेच त्यांच्या इतर लेखनात पुस्तके, शोधलेख, स्फुटलेख, भाषणे, प्रबंध, वर्तमानपत्र यांचा समावेश होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लेखणी ही सुंदर आणि विलक्षण होती.

Edited By- Dhanashri Naik