1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑक्टोबर 2019 (10:47 IST)

काश्मीरमध्ये कट्टरतावाद्यांकडून 5 जणांची हत्या

5 killed by extremists in Kashmir
जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये कट्टरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच मजुरांचा मृत्यू झाला, तर एक मजूर गंभीर जखमी झालाय. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले सर्व मजूर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील आहेत. 
 
या हल्ल्यात जखमी झालेल्या एका मजुरावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
 
युरोपियन महासंघाचं 28 खासदारांचं शिष्टमंडळ जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असतानाच हा हल्ला झाला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
 
मजुरांवरील हल्ल्यानंतर कट्टरतावाद्यांचा शोध घेण्यासाठी कुलगाममध्ये सुरक्षादलाच्या अतिरिक्त तुकड्यांनाही पाचारण करण्यात आलंय.
फोटो: सांकेतिक